जळगाव शिवाजी नगर रेल्वे उड्डानपुलासाठी निविदा प्रसिध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:33 PM2017-11-27T12:33:19+5:302017-11-27T12:37:47+5:30
: तब्बल १०४ वर्षे जुना व अत्यंत जीर्ण झालेला शिवाजीनगर उड्डाण पूल पाडून, त्याच जागी नवीन उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेने निविदा प्रसिद्ध केली आहे. जळगाव ते भुसावळ दरम्यान उभारण्यात येणाºया चौथ्या रेल्वे लाईनमुळे ही निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली असून २६ डिसेंबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत. या पुलासाठी १८ महिन्यांची मुदत कंत्राटदारास देण्यात आली आहे. मनपा, सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या अखत्यारित असलेली कामे तत्काळ मार्गी लावल्यास नवीन पूल उभारण्याच्या कामास गती मिळेल व शहरवासीयांना दिलासा मिळेल.
किशोर पाटील ।
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२७ : तब्बल १०४ वर्षे जुना व अत्यंत जीर्ण झालेला शिवाजीनगर उड्डाण पूल पाडून, त्याच जागी नवीन उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेने निविदा प्रसिद्ध केली आहे. जळगाव ते भुसावळ दरम्यान उभारण्यात येणाºया चौथ्या रेल्वे लाईनमुळे ही निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली असून २६ डिसेंबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत.
या पुलासाठी १८ महिन्यांची मुदत कंत्राटदारास देण्यात आली आहे. मनपा, सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या अखत्यारित असलेली कामे तत्काळ मार्गी लावल्यास नवीन पूल उभारण्याच्या कामास गती मिळेल व शहरवासीयांना दिलासा मिळेल.
हा पूल जीर्ण झाल्याने या पुलावरुन अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बसेससह अन्य वाहनांना फेºयांना प्रवास करावा लागत आहे. नवीन पूल उभारल्यास नागरिकांचे हाल थांबतील.
चौथ्या रेल्वे लाईनसाठी रेल्वे विभागाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरु आहे़ २४ नोव्हेंबर रोजी भूसंपादनाच्या अडचणींबाबत शेतकरी, रेल्वे विभागातील अधिकाºयांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली़ आता चौथ्या मार्गासाठी शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा पूल व्हावा यासाठी ‘लोकमत’कडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे.
रेल्वे विभाग त्यांच्या हद्दीतीलच पुलाचे काम करणार असून त्याच कामासाठी ही निविदा प्रसिध्द करण्यात आली़ महापालिकेच्या हद्दीतील पुलाला जोडण्यासाठी रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला स्वतंत्र निविदा काढावी लागणार आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्यापर्यंत निविदा प्रसिध्द करण्यात आलेली नाही.दोन्ही विभागाच्या निविदा अंतिम झाल्यावर रेल्वे विभागाकडून कामाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी घ्यावी लागणार आहे़ यानंतर महापालिकेची लेखी परवानगी घेवून हा पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अभियंता रोहित थावरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
८ कोटी ६४ लाखांची निविदा..
.मध्य रेल्वेकडून शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी ८ कोटी ६४ लाख ८ हजार ६८९़ २७ रुपये किमतीची ई- निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे़ २६ डिसेंबर ही निविदेची अंतिम मुदत असून याचदिवशी निविदा उघडण्यात येणार आहे़ १८ महिन्यांमध्ये मक्तेदाराला काम पूर्ण करावे लागणार आहे़