आसोदा व भादली शाखेच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी 237 कोटींची निविदा
By admin | Published: June 26, 2017 03:35 PM2017-06-26T15:35:35+5:302017-06-26T15:35:35+5:30
जळगाव तालुक्यातील 25 गावांना होणार लाभ : 237 कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरु
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.26- वाघूर प्रकल्पांतर्गत आसोदा व भादली शाखेचे काम बंदिस्त पाईपलाईनद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी 237 कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरु झाली असून मार्च 2018 र्पयत हे कामे पूर्ण होणार आहे.
आसोदा शाखा व वितरण प्रणालीच्या दाबयुक्त बंदिस्त पाईपलाईन वितरण प्रणालीसाठी 71 कोटी, भादली शाखेच्या कामासाठी 126 कोटी व मुख्य कालव्याच्या विस्तारीकरणासाठी 40 कोटी अशा 237 कोटींची कामे होणार आहे. या कामांची निविदा प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेमुळे 25 गावांना लाभ होणार आहे. गेल्या पाच वर्षापासून आसोदा व भादली शाखेच्या कालव्याच्या वितरण प्रणालीची योजना जमिनीच्या भूसंपादनास शेतक:यांच्या तीव्र विरोधामुळे बंद होती. ही योजना मार्गी लावण्यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिका:यांची बैठक घेतली होती. त्यात कालव्याद्वारे सदरची कामे न करता दाबयुक्त बंदिस्त पाईप लाईनद्वारे वितरण प्रणालीचे काम करण्याबाबत निर्णय झाला. याबाबत पाटबंधारे विभागाने 52 व्या बैठकीत ठराव मंजूर केल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
या गावांना होणार लाभ
भादली शाखेतील नशिराबाद, कडगाव, भादली, शेळगाव, कानसवाडे, भोलाणे, देऊळगाव, सुजदे, खापरखेडा, धामणगाव, नांद्रा, तुरखेडा, आवार, डिकसाई या 16 गावांना तर आसोदा शाखेतील ममुराबाद, आव्हाणे, फुपनगरी, आसोदा, वडनगरी, खेडी, कानळदा या 9 गावांना या योजनेचा फायदा होणार आहे.
या बंदिस्त पाईप लाईन प्रणालीमुळे ड्रिप व स्प्रिंकलर पद्धतीने शेतक:यांना पाणी देणे सुलभ होणार आहे.