नार-पारसाठी निविदा निघणार, जळगाव जिल्ह्याचे चित्र बदलणार - देवेंद्र फडणवीस
By अमित महाबळ | Published: August 25, 2024 01:18 PM2024-08-25T13:18:06+5:302024-08-25T13:19:45+5:30
लखपती दीदी मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधताना जळगाव जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती दिली. नार-पार योजनेची निविदा काढण्याला कॅबिनेटमध्ये मान्यता देत आहोत, असे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या लखपती दीदी मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधताना जळगाव जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती दिली. नार-पार योजनेची निविदा काढण्याला कॅबिनेटमध्ये मान्यता देत आहोत, असे त्यांनी सांगितले.
नार-पार योजनेमुळे जळगाव जिल्ह्याचे चित्र बदलेल, शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळेल. वाघूर, पाडळसे प्रकल्पाला निधी देऊन शेतकऱ्यांना सुजलाम् सुफलाम् करण्याचे काम करत आहोत असेही फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, आजच्या कार्यक्रमाला आलेल्या महिलांनी संख्येचे आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. महिला अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आल्या तरच भारत विकसित होईल, असेही फडणवीस म्हणाले.