करंज येथील आगग्रस्तांना प्रत्येकी दहा हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:15 AM2021-03-20T04:15:56+5:302021-03-20T04:15:56+5:30

जळगाव : तालुक्यातील करंज येथील आगग्रस्तांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट घरपोच मदत पोहचविली. त्यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य ...

Tens of thousands each for the fire victims in Karanj | करंज येथील आगग्रस्तांना प्रत्येकी दहा हजारांची मदत

करंज येथील आगग्रस्तांना प्रत्येकी दहा हजारांची मदत

Next

जळगाव : तालुक्यातील करंज येथील आगग्रस्तांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट घरपोच मदत पोहचविली. त्यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आगीत हानी झालेल्यांना मदत प्रदान केली.

जळगाव तालुक्यातील करंज येथे तीन घरांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात तिन्ही कुटुंबांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या आगीमुळे संबंधीतांचे नुकसान झाल्याची बाब लक्षात घेता, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्येक कुटुंबाला १० हजार रुपयांची मदत दिली. जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी सुधाकर पंढरीनाथ पाटील, दीपक सुधाकर पाटील आणि मधुकर पंढरीनाथ पाटील या तिघांना ही मदत वितरीत केली. याप्रसंगी बालाशेठ राठी, प्रमोद सोनवणे, भोकर विकासोचे सचिव ज्ञानेश्‍वर पाटील, धानोरा खुर्दचे सरपंच देवेंद्र पाटील, जगदीश महाराज, अनिल सपकाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Tens of thousands each for the fire victims in Karanj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.