खानापूर येथे राजपूत समाजाच्या मोर्चाचे बॅनर फाडल्याने तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 04:53 PM2018-01-19T16:53:03+5:302018-01-19T16:57:27+5:30
आॅनलाईन लोकमत
रावेर,दि.१९ : तालुक्यातील खानापूर बसथांब्यावर राणी पद्मावती चित्रपटासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयावर क्षत्रिय राजपूत समाजातर्फे काढण्यात येणाºया मोर्चाबाबत लावण्यात आलेले बॅनर अज्ञाताने फाडले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. त्यामुळे पहाटेपासून समाज बांधवांनी तीव्र संताप व्यक्त केल्याने तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, पोलिसांनी वेळीच धाव घेत फलक काढला. शांतता प्रस्थापित करण्यात व नियंत्रण राखण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान दोषींविरुद्ध कठोर कारवाई होत नसल्यास खानापूर बसथांब्यावरील सर्वच फलक काढून टाकण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,असा इशारा ग्रा.पं.सदस्य प्रकाश चौधरी, देवेंद्र राजपूत, सुनील राजपूत, युवराज राजपूत, शंभू राजपूत, बाळू राजपूत, जीवन राजपूत, आदींनी दिला. ग्रा.पं.प्रशासनाबाबतही संताप व्यक्त करण्यात आला. बसथांब्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात दिरंगाई होत असल्याबाबत ग्रामविकास अधिकाºयविरुद्ध कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. रावेर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.