गणेश व्यापारी संकुल परिसरात तणाव
By admin | Published: March 18, 2017 12:25 AM2017-03-18T00:25:48+5:302017-03-18T00:25:48+5:30
दुस:या दिवशी दुकाने बंद : व्यापा:यांकडून सैनिकास मारहाणीचे प्रकरण तापले
चाळीसगाव : मोबाईल दुरुस्तीच्या वादातून सैन्यातील जवानाला मारहाण प्रकरण दुस:या दिवशी चांगलेच तापले असून शहरातील गणेश व्यापारी संकुलातील दुकाने या तणावमुळे बंद ठेवावी लागली.
16 रोजी सायंकाळी घडलेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद दुस:या दुस:या दिवशी 17 रोजी अधिक तीव्रपणे दिसून आले. एका दुकानदाराकडे मोबाईल दुरुस्तीसाठी आलेला सैनिक देवेंद्रसिंग पूरनसिंग राजपूत (रा.करगाव) व दुकानदारामध्ये मोबाईल दुरुस्तीवरुन वाद झाला आणि दुकानदार व आजुबाजुच्या साथीदारांनी मिळून देवेंद्रसिंगला बेदम मारहाण केली. यात देवेंद्रसिंगच्या डोक्यास जबर दुखापत झाली आहे.
या घटनेमुळे करगावात संताप व्यक्त होत असून गावातील तरुण या घटनेचा जाब विचारण्यासाठी व्यापारी संकुलात दाखल झाले मात्र भितीपोटी अनेकांनी आधीच आपली दुकाने बंद केली होती तर तापते वातावरण पाहून इतरही दुकाने काही वेळातच बंद करण्यात आली. बघ्यांचीगर्दी मात्र चांगलीच जमली होती. दिवसभर या भागात वातावरण तापलेले होते. तसेच घटनेची चर्चाही गावात चांगलीच रंगली होती.
करगाव येथील रहिवासी व भारतीय सैन्यातील जवान देवेंद्रसिंग पूरनसिंग राजपूत यास मारहाण प्रकरणी चाळीसगाव पोलिस स्टेशनला दुस:या दिवशीही रात्री उशीरार्पयत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. दरम्यान हे प्रकरण शहरात गाजत असताना तसेच पोलीसही माहिती घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले असताना या प्रकरणाची साधी नोंदही झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर गंभीर जखमी झालेला जवान देवेंद्रसिंग याच्यावर चाळीसगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले.