जळगावच्या पुरुषांना आलेय टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:16 AM2020-12-31T04:16:32+5:302020-12-31T04:16:32+5:30

महिला पुरुष सौम्य रक्तदाब १०.९ १५.९ तीव्र रक्तदाब ...

Tension in the men of Jalgaon | जळगावच्या पुरुषांना आलेय टेन्शन

जळगावच्या पुरुषांना आलेय टेन्शन

Next

महिला पुरुष

सौम्य रक्तदाब १०.९ १५.९

तीव्र रक्तदाब ५.४ ६.२

रक्तदाब वाढण्याचे कारण

बदलती जीवनशैली, ताणतणावात सातत्याने सुरू असलेले काम, कोलेस्ट्रॉल वाढणे, धूम्रपान, मद्यपान यासारख्या विविध कारणांमुळे रक्तदाब वाढतो.

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अयोग्य जीवनशैली, जेवणाचा अनियमितपणा, भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या समावेशामुळे अनेकांना रक्तदाबाचा त्रास सहन करावा लागत आहे. जळगाव जिल्ह्यात महिलांपेक्षा पुरुषांना जास्त रक्तदाबाचा आणि ताणतणावाचा सामना करावा लागत असल्याचे राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणातून समोर आले आहे.

औषध घेऊन रक्तदाब नियंत्रित करावा लागतो, अशा रुग्णांचे प्रमाणदेखील पुरुषांचेच जास्त आहे. रक्तदाबाचा आजार कुणालाही होऊ शकतो. त्यात भेसळयुक्त अन्नामुळे अनेकांच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते आणि हा त्रासदेखील वाढतो. या त्रासामुळे हृदय, किडनी, मेंदू या अवयवांच्या समस्या उद्भवतात. या समस्या टाळण्यासाठी रक्तदाबावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.

काय काळजी घ्यावी?

रक्तदाब नियंत्रणात राहावा, यासाठी काही वेळ बसल्यानंतर थोडे चालावे, शक्य तेवढ्या शारीरिक हालचाली कराव्यात, शक्य तेवढा वेळ पायी चालावे, लिफ्टऐवजी जिन्याचा वापर जास्तीतजास्त करावा, ध्यान करावे, ताणतणावापासून दूर राहावे, नियमितपणे व्यायाम करावा.

डॉक्टर काय म्हणतात...

सध्या महिलांपेक्षा पुरुषांना रक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. सतत घराबाहेर राहून काम करणे, प्रदूषण, बैठेकाम, बाहेरचे खाणे यामुळे पुरुषांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण जास्त असते.

- डॉ. परीक्षित बावीस्कर

Web Title: Tension in the men of Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.