6 मिनिटांच्या लघुपटाद्वारे मांडला सासरा व जावयाच्या नात्यातील तणाव
By admin | Published: May 3, 2017 12:33 PM2017-05-03T12:33:08+5:302017-05-03T12:33:08+5:30
लघुपटाद्वारे होतेय अमळनेरात हगणदरीमुक्तीबाबत जनजागृती : प्रसाद महाराजांच्या हस्ते अनावरण
Next
अमळनेर,दि.3- सध्या सर्वत्र स्वच्छता व गाव हगणदारीमुक्तीला प्राधान्य दिले जात आहे. याच अनुषगांने अमळनेरातील लोकमतचे छायाचित्रकार महेंद्र पाटील यांनी ‘जावयाचा वांधा.. शौचालय बांधा.’ ही लघुचित्रफित (शॉर्टफिल्म) तयार केली आहे. या चित्रफितीद्वारे स्वच्छता व हगणदारीचे महत्व पटवून दिले आहे.
अमळनेर पालिकेने शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलून, अनेकांवर कारवाई केली. त्यामुळे शहराची वाटचाल हगणदारीमुक्तीकडे होण्यास मदत झाली. हीच बाब लक्षात घेऊन अंबिका फोटोचे संचालक व लोकमतचे छायाचित्रकार महेंद्र पाटील यांनीही सहा मिनिटांची चित्रफित तयार केली.
शौचालय नसल्याने सासरे व जावाई या नाजुक नात्याला कसा तडा जातो, हे या चित्रफितीतून प्रभावीपणे मांडले आहे. या चित्रफितीत प्रवीण माळी (अडावद) यांनी जावायाची भूमिका साकारली आहे. बंडू देशमुख, प्रमोदिनी पाटील यांनी सासरे-सासूची भूमिका साकारली आहे. त्यांना समाधान सोनार, खुशी वानखेडे, गौरव पवार, भटू पाठक, हरिचंद्र पाटील यांनी सहकार्य केले आहे.
या चित्रफितीची कथा, संकल्पना, दिग्दर्शन महेंद्र पाटील यांनी केली आहे. तर छायांकन व संकलन गौरव शुक्ल, महेंद्र पाटील यांनी केले. निर्मिती प्रमुख योगेश कासार व दर्शन जैन यांनी केले. तर संगीत व डबिंग- प्रसाद देशपांडे विशाल वानखेडे यांनी केले. कला दिग्दर्शन गौरव पवार, विवेक बि:हाडे, पवन चौधरी यांनी केले. तर सहाय्यक ऋषिकेश मराठे, संदीप अहिरराव, सँडी संदानशिव, संदीप भोई यांनी केले.
यासाठी अमळनेर नगरपरिषद, अगिAशमन पथक, पोलीस स्टेशन, रवी पेंटर पैलाड, शशिकांत अंधारे, निशांत नेरकर, किरण बागुल यांचे सहकार्य लाभले. महाराष्ट्र शासनाने या चित्रफितीची दखल घ्यावी अशी अपेक्षा महेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.
या शॉर्टफिल्मचे अनावरण अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर वाडी संस्थानचे गादीपती ह.भ.प.प्रसाद महाराज यांच्या हस्ते झाले. या चित्रफितीच्या शुभारंभ प्रसंगी आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील, उपविभागिय अधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, मुख्याधिकारी पी.जी.सोनवणे, उपअधीक्षक रमेश पवार उपस्थित होते.