अवैध वाळू वाहतुकीवरुन आव्हाणे गावात तणाव
By admin | Published: April 16, 2017 01:00 PM2017-04-16T13:00:54+5:302017-04-16T13:00:54+5:30
आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रातून होत असलेल्या अवैधरित्या वाळू वाहतुकीला विरोध करणा:या तरुणाच्या डोक्यात डंपर चालकाने फावडा टाकल्याची घटना घडली
Next
वाहन अडविणा:याचा डोक्यात टाकला फावडा : डंपरसमोर ग्रामस्थांचा ठिय्या
जळगाव,दि.16-तालुक्यातील आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रातून होत असलेल्या अवैधरित्या वाळू वाहतुकीला विरोध करणा:या तरुणाच्या डोक्यात डंपर चालकाने फावडा टाकल्याची घटना शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने गावातील दोन गट समोरा समोर आल्याने तणाव निर्माण झाला होता. रात्री उशीरार्पयत गोंधळ सुरुच होता. पोलिसांनी हस्तक्षेप करीत ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रय} केला.
शनिवारी रात्री वाळू वाहतूक करणा:या डंपरचालकाने नेहमीच्या रस्त्याने न जाता, गावातील मुख्य भागातील रस्त्यावरून डंपर (एम.एच.11, ए.एल.2263) नेल्याने दीपक धर्मराज शिंदे, विनोद कापुरे यांच्यासह काही युवकांनी डंपर चालकाला या रस्त्याने डंपर का नेला? असा जाब विचारला. त्यावरून डंपर चालक आनंदा सपकाळे याने विरोध करणा:या दीपक शिंदे या तरुणाच्या डोक्यात फावडा टाकला. या घटनेमुळे गावकरी कमालीचे संतापले.