फरकांड्याच्या जवानाकडून दहशतवाद्याचा खात्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 08:46 PM2020-02-01T20:46:23+5:302020-02-01T20:48:05+5:30

जम्मू ते श्रीनगर महामार्गावर जैशच्या अतिरेक्यांंनी अचानक फायरिंग केल्यानंतर उत्तरादाखल केलेल्या कारवाईत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यात एका अतिरेक्याचा फरकांडे येथील अरुण दिलीप पाटील या जवानाने खातमा केला आहे.

Terrorist killings from Jawana of Farandi | फरकांड्याच्या जवानाकडून दहशतवाद्याचा खात्मा

फरकांड्याच्या जवानाकडून दहशतवाद्याचा खात्मा

Next
ठळक मुद्देअरुण पाटील या जवानाने केला जीवाची बाजी लावून तीनपैकी एकाचा खात्मा महानिदेशकांनी मेडल देऊन केला सत्कारफरकांडेवासीयांची छाती अभिमानाने फुलली

कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : जम्मू ते श्रीनगर महामार्गावर जैशच्या अतिरेक्यांंनी अचानक फायरिंग केल्यानंतर उत्तरादाखल केलेल्या कारवाईत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यात एका अतिरेक्याचा फरकांडे येथील अरुण दिलीप पाटील या जवानाने खातमा केला आहे. दि.१ रोजी सीआरपीएफचे महानिदेशक डॉ.ए.पी.माहेश्वरी यांनी अरुणला मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविले.
याबाबत प्रत्यक्ष अरुण पाटील या जवानाने दिलेली माहिती अशी की, दि. ३१ रोजी पहाटे पाचला जे.के. पासिंगच्या एका ट्रकला राष्ट्रीय महामार्ग ४४ च्या बनटोल प्लाझावर स्थानिक पोलिसांनी चेकिंगसाठी अडवले. पण त्या ट्रकमध्ये लपलेल्या चार आतंकवाद्यानी जम्मू काश्मीरच्या पोलिसावर गोळीबार सुरू केल्याने तो जखमी झाला. आम्ही होतो त्या दिशेने पळत आला. तो पळत येताना आमच्या वरिष्ठ सहकाऱ्याने पाहिले व लागलीच आम्हाला सूचना केल्या. आम्ही क्षणाचाही विलंबन करता ट्रकच्या दिशेने फायरिंग सुरू केली. ट्रकमध्ये एकूण चार अतिरेकी होते. त्यात दोन मारले गेले, तर दोन जंगलात पळून गेले. त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही सर्च आँपरेशन सुरू केले. आमचे दोन ड्रोन या दोन अतिरेक्यांनी पाडले. परंतु पळून जाताना दोघांपैकी एक आमच्या गोळीबारात जखमी झाला होता. त्याचे रक्त वहात असल्याने त्या मार्गावरुन आम्ही पुढे सरकत असताना एक अतिरेकी आमच्या दिशेने गोळीबार करणार तोच त्याला माझ्या गोळीने कंठस्नान करण्यात मी यशस्वी ठरलो. दुसरा जखमी जिवंत पकडला आहे, अशी आंखो देखी माहिती अरुणने दिली.
हे आॅॅपरेशन यशस्वी केल्याने सीआरपीएफच्या महानिदेशकांनी या आॅपरेशनमधील सहभागी सर्व जवानांना शनिवारी भोजनाची मेजवानी दिली. मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.
अरुण हा फरकांडे येथील दिलीप पाटील यांच्या सुपुत्र आहे. ३२ वर्षांचा हा धाडशी तरुण २००७ साली सैन्यात भरती झालेला आहे. त्याच्या या धाडशी कामगिरीने फरकांडेवासीय गावाच्या सुपुत्राच्या कामगिरीसाठी गर्व व्यक्त करीत आहेत.
 

Web Title: Terrorist killings from Jawana of Farandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.