रेल्वे स्थानकावर पकडले दहशतवादी ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:13 AM2021-06-20T04:13:30+5:302021-06-20T04:13:30+5:30

भुसावळ : शहर व परिसरात रेल्वे स्टेशन, भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी, आर्मीचे आर्टिलरी सेंटर, दीपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्प ...

Terrorists caught at railway station ... | रेल्वे स्थानकावर पकडले दहशतवादी ...

रेल्वे स्थानकावर पकडले दहशतवादी ...

Next

भुसावळ : शहर व परिसरात रेल्वे स्टेशन, भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी, आर्मीचे आर्टिलरी सेंटर, दीपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्प ही महत्त्वाची स्थाने आहेत. या ठिकाणी अचानक कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पोलीस दल सज्ज आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी मॉकड्रिल करण्यात आले. यात रेल्वेस्थानकावर दहशतवाद्यांना पकडण्याचे व इतर अन्य ठिकाणी वेगवेगळे प्रात्याक्षिक करण्यात आले.

पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे , अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या निर्देशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी आपत्कालीन परिस्थिती ओढविल्यास पोलीस प्रशासन कशाप्रकारे सज्ज आहे याची प्रात्यक्षिके करवून घेतली.

सर्वप्रथम पोलीस निरीक्षक भागवत, बाजारपेठ पोलीस स्टेशन यांनी भुसावळ रेल्वे स्टेशन या ठिकाणी एक बेवारस बॅग असून त्या बॅगमध्ये बॉम्बसदृश वस्तू आहे. तसेच काही दहशतवादी रेल्वे स्टेशनवर आले असून त्यांनी काही लोकांना ताब्यात घेऊन तेथेच बंदिस्त करून ठेवल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानुसार तात्काळ सर्व पोलिस अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले.यावेळी बॉम्बशोधक पथकाची देखील गरज आहे हे लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस मुख्यालय जळगाव या ठिकाणावरून बॉम्ब शोधक पथकाची मागणी केली.काही वेळातच हे पथके त्या ठिकाणी पोहोचले. सर्वप्रथम पथकाने दहशतवाद्यांनी ज्या ठिकाणी नागरिकांना ओलीस ठेवले आहेत त्या ठिकाणाची माहिती घेतली व तात्काळ अतिशय शिस्तबद्ध कारवाई करून सदर ओलीस ठेवलेल्या इसमांची सुटका केली. दरम्यानच्या काळामध्ये तेथे असलेल्या पोलिस अंमलदारांनी तसेच आरसीपी पथकाने संपूर्ण परिसर हा निर्मनुष्य केला व त्यानंतर सुरू झाला बॉम्बशोधक पथकाच्या कारवाईचा थरार.

बॉम्बशोधक पथकाने सर्वप्रथम संपूर्ण परिसर निर्मनुष्य झाल्याची खात्री केली व त्यानंतर एक-एक साहित्याच्या साहाय्याने रेल्वे स्टेशन पार्किंग मध्ये ठेवण्यात आलेली बेवारस बॅग चेक केली. बॉम्बशोधक पथकाच्या डॉगनेदेखील सहभाग घेतला व सदरची बॉम्बसदृश्य वस्तू डिफ्युज करण्यात आली.

नगरपालिका भुसावळ त्यांच्याकडील वैद्यकीय पथक ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेडची गाडीदेखील काही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ उपाय योजनेसाठी त्याठिकाणी हजर होती.

कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक भागवत, पोलीस निरीक्षक ठोंबे, पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये, मंगेश गोंटला, पोलीस निरीक्षक दुनगुहू, चव्हाण व सर्व पोलीस अंमलदार सामील झाले होते.

Web Title: Terrorists caught at railway station ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.