प्रत्येक हंगामात 'बळीराजा'ची कसोटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:12 AM2021-05-28T04:12:59+5:302021-05-28T04:12:59+5:30
यावर्षी भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नावे नोंदवून महिना उलटला आहे. मात्र अजूनही खरेदीच्या मुहूर्ताचे नारळ फुटलेले नाही. मार्च महिन्याच्या २० ...
यावर्षी भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नावे नोंदवून महिना उलटला आहे. मात्र अजूनही खरेदीच्या मुहूर्ताचे नारळ फुटलेले नाही. मार्च महिन्याच्या २० ते २४ या पाच दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी हंगामाची धूळधाण केली. १० हजार ९१८ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. ८३ गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे केले गेले. तीन हजार ६३० हेक्टरवरील पिकांचे हातातोंडाशी आलेले घास मातीमोल झाले. फळबागांसह ज्वारी, कांदा, मका, केळी आदी पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आभाळ दाटून आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही शासनाच्या मदतीचा छदामही भेटलेला नाही. एकंदरीतच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. कोरोना महामारीत जगाची पावले थांबली असताना बळीराजा मात्र अन्नदाता म्हणून अजिबात थांबला नाही. त्यामुळेच लॉकडाऊन असतानाही अन्नधान्य असो की, भाजीपाला, दूध, फळे जनतेला मिळत आहे. यावर्षी तालुक्यात ९० हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. मान्सूनपूर्व कपाशी लागवडीसाठी शेतकरी सरसावले असले तरी, कृषी विभागाने एक जूननंतरच अशी लागवड करावी, असे आवाहन केले आहे. ‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे बोगस बियाणे, खते आदी प्रश्नांमुळे शेतकऱ्यांचा जीव दरवर्षी टांगणीला लागतो. यंदाही हे संकट टळलेले नाही. रासायनिक खतांचा १० टक्के वापर कमी करावयाचे धोरण असल्याने खतांची टंचाई जाणवणार आहे. जास्त मागणी काळ्या बाजाराला खतपाणी घालणारी ठरते. दरवर्षी बोगस बियाणे, खते देऊन शेतकऱ्यांना लुबाडले जातेच. बारोमास हे होत आले आहे. पुढेही चालूच राहणार आहे. असेच काहीसे चित्र आहे