वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेत बदल करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:16 AM2021-04-08T04:16:22+5:302021-04-08T04:16:22+5:30
जळगाव : कोरोना व वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या परीक्षांच्या वेळांमध्ये बदल करण्यात यावा व विद्यार्थ्यांना जवळचे केंद्र ...
जळगाव : कोरोना व वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या परीक्षांच्या वेळांमध्ये बदल करण्यात यावा व विद्यार्थ्यांना जवळचे केंद्र निवडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष घेतल्या जाणार आहेत. या निर्णयाचा अभाविपने स्वागत केले आहे. दरम्यान, सध्या कोरोनाचा संसर्गही वाढला असून, उष्णताही वाढत आहे. त्यामुळे परीक्षांच्या वेळांमध्ये बदल करण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र आपल्या घराजवळचे निवडण्याची मुभा द्यावी. ताळेबंदीचा विचार करता परीक्षार्थींना लोकल, महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस आणि महानगरपालिोच्या बसची सुविधा परीक्षेच्या कालावधीत उपलब्ध करून द्यावी, तसेच शाळा व महाविद्यालयांद्वारे निर्जंतुकीकरणाची व्यवस्था प्रभावी करण्यात यावी. त्याचबरोबर विशेष परिस्थितीत शिक्षकांना पेपर घरी तपासण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.