चाचण्या पाच लाखांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:16 AM2021-03-08T04:16:20+5:302021-03-08T04:16:20+5:30
मृत्युदर घटला जळगाव : रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यात कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण घटून २.१९ टक्क्यांवर आलेले आहे. ...
मृत्युदर घटला
जळगाव : रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यात कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण घटून २.१९ टक्क्यांवर आलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण कमी झाले आहे. दुसरीकडे मात्र, नियमित होणारे मृत्यू वाढताना दिसत असल्याचे गंभीर चित्र आहे. मृतांची संख्या १४०३ वर पोहोचली आहे.
३ हजार रुग्ण घरी
जळगाव : ३०८० रुग्ण हे होम आयसोलेशनमध्येच उपचार घेत आहेत. सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना याची परवानगी दिली जाते यासाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ही ३३९० वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्ण ४४०७ आहेत.
ग्रामीणमध्येही संसर्ग वाढला
जळगाव : जळगाव शहरासह आता ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शनिवारी जळगाव ग्रामीणमध्ये ३० रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीणमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या १६३ वर पोहोचली आहे. मध्यंतरी या ठिकाणच्या सक्रिय रुग्णांची संख्या अगदीच चार व पाचवर आलेली होती.
३३ रुग्ण बाहेरचे
जळगाव : बाहेरील जिल्ह्यातील ३३ रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. नियमित रुग्ण बाधित आढळून येत आहे. शनिवारी असे ३ बाधित आढळून आले होते. एकूण संख्या ५६६ झाली असून यापैकी ५३३ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. सुदैवाने यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.