बड्या नेत्यांची जळगाव जिल्ह्याकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:58 AM2019-04-28T11:58:41+5:302019-04-28T11:59:20+5:30
कॉँग्रेसतर्फे झाली केवळ एक सभा
जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जिल्हयात यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राष्टÑवादीचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांचा अपवाद वगळता केंद्रीय नेत्यांच्या सभा झाल्याच नाहीत. मात्र जे नेते आले त्यांच्या सभा गाजल्या. जळगाव व रावेर मतदार संघ मिळून जिल्ह्यात विविध पक्षांच्या एकूण १७ नेत्यांच्या सभा झाल्या. त्यामुळे वातावरणही तापल्याची स्थिती होती.
जळगाव व रावेर लोकसभा निवडणुकीसाठी २८ मार्चला अधिसूचना जाहीर झाली. ८ एप्रिलला लढती स्पष्ट झाल्या. जळगावसाठी १४ तर रावेरसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. जळगावसाठी भाजपने आमदार उन्मेष पाटील, राष्टÑवादीने माजी मंत्री गुलाबराव देवकर, रावेरसाठी भाजपने खासदार रक्षा खडसे तर कॉँग्रेसने माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली. या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या त्या पक्षाच्या स्टार प्रचारकांनी सभा घेतली.
केवळ दोन केंद्रीय नेत्यांची सभा
राष्टÑवादी कॉँग्रेसने एरंडोल येथे पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची एक सभा झाली तर भाजपाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भुसावळ येथे केवळ एक सभा झाली. अन्य कोणीही राष्टÑीय पातळीवरील नेते जिल्ह्यात फिरकले नाहीत.
कॉँग्रेसची एक सभा
जिल्ह्यात कॉँग्रेसतर्फे पक्षाच्या नेत्यांपैकी केवळ प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची एक सभा मुक्ताईनगर तालुक्यातील कुºहा येथे झाली. पक्षातर्फे या व्यतीरिक्त अन्य नेता जिल्ह्यात आला नाही.
मुख्यमंत्र्यांनी घेतल्या सभा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावेर, अमळनेर व जळगाव येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. अमळनेर येथे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या व्यासपीठावरील हाणामारीमुळे ‘डॅमेज कंट्रोल’साठी एक सभा घेण्यात आली. तर जळगाव शहराचे मतदान हे निवडणुकीवर परिणामकारक ठरत असल्याने येथे वातावरण निर्मितीसाठी त्यांची सभा झाली. या व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची शिंदाड ता. पाचोरा, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची जळगाव व चोपडा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची नगरदेवळा ता. पाचोरा, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, जिल्हा प्रभारी सरोज पांडे, महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. माधवी नाईक यांनी शहरात मेळावा व बैठक घेतली. गिरीश महाजन यांनीही मेळावे व सभा घेतल्या.
राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे आले राज्यातील नेते
राष्टÑवादी कॉँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड हे दोन वेळा जिल्ह्णात आले. पहिल्या दौºयात त्यांनी आघाडीच्या नेत्यांचा मेळावा घेतला. यानंतरच्या दौºयात त्यांनी चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, जळगाव शहरातील मेहरूण भागात सभा घेतली.
माजी मंत्री छगन भुजबळ यांनी कोळगाव ता. भडगाव, फौजिया खान यांनी नशिराबाद, जळगाव शहरात, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शहरात कॉर्नर सभा घेतल्या. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चाळीसगाव येथे सभा घेतली.
अशी होती सभांची वैशिष्टये
जिल्ह्णात बºयाच सभा दुपारच्या वेळी भर उन्हात झाल्या. तरीही समर्थक नागरिकांनी सभांना उपस्थिती दिली. यावेळी खेड्यात झालेल्या सभांचे लाईव्ह प्रक्षेपण यु ट्युब चॅनलद्वारे प्रसारीत केले गेले. राजकीय पक्षांनी त्याचे नियोजन केले होते.
जातीय समिकरणानुसार सभा
मतदारांचे एकगठ्ठा मतदान व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन बहुतांश सभा झाल्या. मराठा, वंजारी, मुस्लिम यासह विविध समाजांना आपल्याकडे वळविण्याचा राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सभांच्या माध्यमातून प्रयत्न केल्याचे दिसून आले.
सभांमुळे वातावरण निर्मितीत भर पडली. पक्षाच्या नेत्यांनी विविध ठिकाणी घेतलेल्या सभांमुळे मोठ्या प्रमाणात मत परिवर्तन करण्यात यश आले. - अॅड. रवींद्र पाटील,
जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी कॉँग्रेस
पक्षातर्फे केवळ प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची सभा झाली. सभांऐवजी आम्ही मतदारांच्या संपर्कावर भर दिला. त्याचे सकारात्मक परिणाम जाणवले. -अॅड. संदीप पाटील,
जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस