मुक्ताईनगर तालुक्यात उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांची लसीकरणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 02:40 PM2018-12-01T14:40:49+5:302018-12-01T14:42:09+5:30

मतीन शेख । मुक्ताईनगर , जि.जळगाव : गोवर आणि रूबेला या विषाणुजन्य आजारावर मात करण्यासाठी २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या ...

Text of vaccination of Urdu medium students in Muktainagar taluka | मुक्ताईनगर तालुक्यात उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांची लसीकरणाकडे पाठ

मुक्ताईनगर तालुक्यात उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांची लसीकरणाकडे पाठ

Next
ठळक मुद्देलसीकरणाबाबत पालकांच्या मनात धास्तीसमजूत काढण्यात आरोग्य विभागाची होतेय दमछाकसमाजातील प्रतिष्ठितांची लसीकरण जागृतीसाठी घेतली जातेय मदत

मतीन शेख ।
मुक्ताईनगर, जि.जळगाव : गोवर आणि रूबेला या विषाणुजन्य आजारावर मात करण्यासाठी २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. लसीकरणाबाबत मनात धास्तीने पालकच आपल्या पाल्यांना लस देण्यास नकार देत आहे. यामुळे शाळेतील पटसंख्या रोडावली आहे, तर दुसरीकडे आरोग्य विभाग त्यांची समजूत काढण्यास दमछाक करीत आहे. यात समाजातील प्रतिष्ठितांसह मुल्ला-मौलवी यांची लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी मदत घेतली जात आहे
नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील तालुक्यातील १०९ प्राथमिक शाळा व ४१ खासगी शाळा व २०० अंगणवाडीमधील ४८ हजार ३८३ विद्यार्थ्यांना लसीकरण देण्यात येणार आहे. पहिले चार आठवडे शाळांमध्ये व नंतर अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना लस दिली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात लसीकरणाबाबत अनेक शाळांमध्ये प्रतिसाद मिळत असताना तेवढीच जागरूकतेने शहानिशा पालक कारीत आहे. शहरी भागातील पालक आवर्जून लसीकरणाच्या दिवशी शाळेत जाऊन लसीकरणानंतर पाल्यांची विचारपूस करीत आहे तर उर्दू विभागात लसीकरण करण्यास आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. शाळेत गेलेल्या आरोग्य पथकाला थेट पालक शाळेत येऊन लसीकरण करण्यास विरोध करीत आहे, ही अवस्था जिल्ह परिषदेच्या उर्दू शाळांसह खासगी शाळांमध्ये आहे. सोशल मीडिया, प्रतिष्ठित, मौलाना आदींची मदत घेऊन आरोग्य विभाग लसीकरण मोहीम यशस्वी करण्यास धावपळ करीत आहे

तालुक्यातील ४८ हजार ३०० बालकांना लसीकरण करण्याचे पूर्ण नियोजन आहे. एक-दोन ठिकाणी उर्दू शाळेचा अपवाद वगळता लसीकरण सुरळीत सुरू आहे. एकही ठिकाणी लसीकरणाबाबत तक्रार नाही
-डॉ.नीलेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुक्ताईनगर

आरोग्य विभागातर्फे गोवर रुबेला लसीकरण मोहीम स्वागतार्ह बाब आहे. लसीकरणाबाबत गैरसमज नको. लसीकरणानंतर दोन ते तीन दिवसात अंगावर लाल बारीक पुरळ येणे किंवा ताप येणे सामान्य बाब होय. या लसीकरणाची रिअ‍ॅक्शन होत नाही.
-डॉ.शिवाजी चौधरी,
बालरोगतज्ज्ञ, मुक्ताईनगर

तालुक्यात आमच्या शिक्षण विभागांतर्गत जवळपास ३० हजार बालकांना लसीकरण होणार आहे. उर्दू विभागाची अपवादात्मक बाब वगळता अन्य ठिकाणी बालकांना लसीकरणाबाबत प्रतिसाद मिळत आहे.
- व्ही. डी.सरोदे,
प्रभारी शिक्षण अधिकारी, मुक्ताईनगर

Web Title: Text of vaccination of Urdu medium students in Muktainagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.