जळगावात मित्राच्याच एटीएमचे बनविले बनावट एटीएम कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:51 PM2018-05-26T13:51:47+5:302018-05-26T13:51:47+5:30
आॅनलाइन फसवणुकीच्या प्रकरणातील निशांत तेजकुमार कोल्हे (रा़ कोल्हेनगर) या अटक केलेल्या संशयितावर गुरूवारी रात्री आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. याप्रकरणात निशांतने त्याच्याच मित्राचे एटीएमकार्ड वापरण्यासाठी घेवून त्याचे बनावट एसटीम (क्लोन) तयार करून गैरव्यवहार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२५ : आॅनलाइन फसवणुकीच्या प्रकरणातील निशांत तेजकुमार कोल्हे (रा़ कोल्हेनगर) या अटक केलेल्या संशयितावर गुरूवारी रात्री आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. याप्रकरणात निशांतने त्याच्याच मित्राचे एटीएमकार्ड वापरण्यासाठी घेवून त्याचे बनावट एसटीम (क्लोन) तयार करून गैरव्यवहार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
औरंगाबाद येथील बजाज फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक जयरुद्दीन बदरुद्दीन शेख (रा. त्रिवेणीनगर) यांनी १८ मे रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून निशांत याच्याविरूध्द आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हाच्या चौकशी दरम्यान निशांत यास अटक केल्यानंतर त्याने मोठ्या फायनांन्स कंपन्यांना कोट्यांवधींचा चुना लावल्याचे उघड झाले होते़ त्यातच गुरूवारी रात्री संशयीत निशांतवर आयटी अॅक्ट ६६ सी प्रमाणे दिग्वीजय गजानन चत्रे (वय १७) यांच्या फियार्दीवरून रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यामध्ये दिगवीजय याचे एसबीआय बँकेचे एटीएम डेबीट कार्ड निशांत याने वापरण्यसाठी डिसेंबर २०१७ ते २३ मे २०१८ दरम्यान घेतले होते. या दरम्यानात निशांतने या कार्डचे क्लोन (बनावट) तयार करून गैरव्यवहारासाठी वापर केला.
तुटलेले कार्ड केले परत
बनावट एटीएमकार्ड तयार केल्यानंतर निशांत याने दिगवीजय याला तुटलेले कार्ड दिले. तर त्यानंतर एटीएमचे क्लोन कार्डद्वारे आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले़ अखेर गुरूवारी रात्री दिग्विजय याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात येऊन निशांत याच्याविरूध्द फिर्याद दाखल केली आहे़
आॅनलाईन पध्दतीने ट्रेडमिल सायकल ईएमआय कार्ड प्रणालीद्वारे फिटनेस वन इंडिया कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यातील निशांत तेजकुमार कोल्हे याला शुक्रवारी न्यायाधीश घोरपडे यांच्या न्यायालयात हजर केले असता २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
तपासात संशयित निशांत याच्याकडे पेटीएमची फेक की मिळून आली आहे. तसेच त्यांने बिट कॉईन मिनींगचे मशिन एस-७ हे बीट माईन डॉट कॉमवरून खरेदी केले आहे. ते मशिन त्याने सुधीर शिंदे उर्फ साई पांचाळ रा. परभणी याला विकले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांची देखील चौकशी केली आहे.
तपासात त्याच्याजवळ जवळपास २०० क्रेडीट कार्डचे डिटेल आहे. हे कार्ड कोणाचे व कुठून आणले आहे. याची पोलिस चौकशी करीत आहे. त्याच्याकडून एक संगणक संच, विविध कंपन्याचे सीमकार्ड, बॅकांचे शॉपींग व डेबीट कार्ड तसेच वायफाय मशिन व मॅग्नेटीक स्ट्रीप कार्ड रिडर राईटर मशिन देखील मिळून आले आहे.