जिरेमाळी समाजातर्फे गुणगौरव समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 04:55 PM2018-09-07T16:55:25+5:302018-09-07T16:55:40+5:30
रावेर तालुक्यातील विवरे येथे सन्मान
विवरे, ता.रावेर, जि.जळगाव : विवरे येथे जिरेमाळी समाज सेवा संघ जळगाव जिल्हा व जिरेमाळी समाज पंच मंडळ विवरे यांच्यातर्फे मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा आंतरराज्यीय गुणगौरव सोहळा बेंडाळे हायस्कूलमध्ये पार पडला. शालिकराम पाटील अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी प्रतिमा व दीपप्रज्वलन जिरेमाळी समाजसेवा संघाचे संस्थापक नारायण नवले, मालती महाराज, छाया नवले, बºहाणपूर माळी समाज अध्यक्ष पांडुरंग सोनवणे, सुरेश इंगळे, विभागीय उपाध्यक्ष नाना सणंसे, बºहाणपूर पंचायत समिती सदस्य ज्योती गोंडेकर व मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा वृक्ष देवून सत्कार करण्यात आला. जिल्हा सचिव संजीव डोंगरे, युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र वाघ, तालुकाध्यक्ष टिकाराम जुनघरे, दिनेश भगत, प्रशांत झगडे, समाधान डोंगरे, संदीप पाटील जळगाव, युवा तालुकाध्यक्ष भागवत महाजन, पिंटू माळी, विजय पुराणे, धीरज महाजन, विजय नरवाडे, संतोष सपकाळ, महिला तालुका अध्यक्ष जिजाबाई डोंगरे, भारती डोंगरे, रुपाली भागावंत, अनिता सावळकर भागदेरा, रमण खोंड, शंकर सणंसे, सोपान डोंगरे, दिवाकर जिरी, हर्षल वाघ, राजू सणंसे, शिवाजी डोंगरे, रामदास मोकासे, विजय डोंगरे यांनी हा सत्कार केला. माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून नंदकिशोर भागवत, पदमाकर महाजन, उमेश महाजन, शालीकराम पाटील, मालती महाराज, नाना सणंसे, पांडुरंग टेम्प, सुरेश जिरीमाळी, विनायक जिरी, माजी सरपंच आशा नरवाडे, उपसरपंच रवींद्र वासनकर यांच्याहस्ते गौरविण्यात येवून सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व रोख बक्षीस वाटप करण्यात आले. नारायण नवले आणि शालिकराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला ताराचंद गोंडेकर, किसन महाजन, राहुल सपकाळ, मुरलीधर सावळकर, पोलीस पाटील योगेश नरवाडे, लोधीपूर उपसरपंच कैलास हंकारे, रघुनाथ सुरळकर, काशिनाथ खुर्द, तुळशीराम सपकाळ, भारती जिरी, कविता पुराणे, जगन बोरमाडे, शांताराम टेम्पे, जनार्दन जुनघरे, ताराचंद इंगळे यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी व समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी विजय नरवाडे, प्रल्हाद पुनतकर, देवेंद्र सपकाळ, गणेश सणंसे, विष्णू महाजन, मकडू टेम्पे, लखीचंद जिरी, प्रशांत पुंड, सुरज नरवाडे, भानुदास महाजन, रवींद्र जुनघरे, धीरज महाजन, मुकेश पाटील भागदेरा, किशोर महाजन, पंकज सपकाळ, महेंद्र दांडगे, धनराज इंगळे, अक्षय वासनकर, रूपेश नरवाडे, सतीश इंगळे यासह समाजबांधवांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मयुर खुर्दे, पूजा इंगळे, योगिता जुनघरे यांनी केले. तर आभार नाना पाटील, संजीव डोंगरे यांनी मानले.