त्यामुळेच मी राजकारणात वेगळा ठसा उमटवू शकलो- जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 10:13 PM2023-10-08T22:13:17+5:302023-10-08T22:14:08+5:30
विद्यापीठाच्या युवारंग युवक महोत्सवाचे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
भूषण श्रीखंडे, जळगाव: मी महाविद्यालयात असतांना अनेक नाटकं या रंग मंचावर सादर केली, आणि त्यातूनच मी घडत जाऊन राजकारणात वेगळा ठसा उमटवू शकलो. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर घडविण्यासाठी युवक महोत्सवाचा निश्चितच फायदा होणार असून विद्यार्थी कलावंतांनी या महोत्सवात आपले अंगभूत कलागुण दाखवावे या असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि के.सी.ई. संस्थेचे मुळजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवाचे उद्घाटन करतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. पुढे बोलतांना पालकमंत्री पाटील म्हणाले, की तुम्ही किती शिकला यापेक्षा तुमची मांडणी कशी आहे. हे आज महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे कला सादर करतांना उत्तम करा. यातून उद्याचे कलावंत घडणार आहेत. जे राज्यात आपला स्वतंत्र ठसा उमटवतील. या महोत्सवात मुलींचा सहभाग वाढल्याबद्दल त्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.
अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष अशोक जैन उपस्थित होते. तर मंचावर संस्था अध्यक्ष व व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, आमदार सुरेश भोळे, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, महोत्सवाचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, सहसंचालक प्रा.संतोष चव्हाण, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.शिवाजी पाटील, प्रा. साहेबराव भूकन, प्राचार्य संजय सुराणा, प्रा सुरेखा पालवे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ.पवित्रा पाटील, ॲड. अमोल पाटील, नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, संस्थेचे कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्राचार्य एस. एन. भारंबे, राज्य सुकाणू समिती सदस्य अनिल राव, भरत अमळकर, प्र अधिष्ठाता प्राचार्य एस. एस. राजपूत, प्राचार्य ए. पी. खैरनार, प्राचार्य अशोक राणे, ॲड. प्रमोद पाटील, भालचंद्र पाटील, डॉ. हर्षवर्धन जावळे, ॲड. प्रवीणचंद्र जंगले, रुपेश चिरमाडे, संजय प्रभूदेसाई, सीए रवींद्र पाटील, प्रा.योगेश पाटील, डॉ.जुगलकिशोर दुबे, डॉ. मनोज महाजन उपस्थिती होते.