जे बोललो ते करून दाखविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:29 PM2019-03-02T12:29:08+5:302019-03-02T12:29:15+5:30

पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भावना

That's what they said | जे बोललो ते करून दाखविले

जे बोललो ते करून दाखविले

Next
ठळक मुद्देनिरोप व स्वागत समारंभ

जळगाव : जिल्ह्यात सात महिन्यांचा कार्यकाळ मिळाला़ यामध्ये जे बोललो होतो ते मी करून दाखविले़ कायदा सुव्यवस्था व जनहिताच्या कल्याणासाठी अधिकार वापरले. अंतर्गत बदल्या केल्या. यामुळे कुणी दुखावले असेल पण तो कामाचा भाग होता, असे सांगत मावळते पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केले़
पोलिस दलातर्फे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता मंगलम हॉलमध्ये मावळते पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना निरोप व नूतन पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर अपर पोलिस अधीक्षक लोहीत मतानी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, शिस्त पोलिस दलाची ताकद आहे. यापुढेही शिस्तीने वागा. शिस्तीच्या जोरावर भुसावळमधील ५० वर्षांपासून रखडलेले अतिक्रमण काढू शकलो. जळगावातील अतिक्रमण काढले. आगामी काळात निवडणुका आहेत. समान वागणूक द्या. कायदा सुव्यवस्थेसाठी झोकून काम करा असे मार्गदर्शक केले. उगले यांनी सांगितले की, शिंदे हे माझे वर्गमित्र आहेत, त्यांचे कार्य वाखाण्याजोगे आहे. आपणास अजून दोन दिवस झाले आहेत. जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी, शांतता व कायदा सुव्यवस्थेसाठी कार्य करेल. मनुष्य बळाचा योग्य वापर करून चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न असेन असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, मतानी यांनी मनोगत व्यक्त केले. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांनी आभार मानले.
स्वत:च्या वाहनातून रवाना झाले शिंदे
मावळत्या पोलीस अधीक्षकांना निरोप देण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे चारचाकी वाहनाला सजवून त्यातून मिरवणूक काढली जाते़ मात्र, शिंदे यांनी त्यास नकार देत ते आपल्या वाहनातून जाणे पसंत केले.

Web Title: That's what they said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.