पत्नीने घटस्फोट दिल्याचा संताप, पोलिसाच्याच लगावली कानशिलात; गुन्हा दाखल

By सुनील पाटील | Published: August 30, 2022 03:56 PM2022-08-30T15:56:40+5:302022-08-30T15:57:58+5:30

पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, बापुराव मोरे जळगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असून सोमवारी त्यांना डायल ११२ या शासकीय पोलीस वाहनावर आरटीपीसी ड्युटी होती

The anger of the wife's divorce was heard by the police in jalgaon | पत्नीने घटस्फोट दिल्याचा संताप, पोलिसाच्याच लगावली कानशिलात; गुन्हा दाखल

पत्नीने घटस्फोट दिल्याचा संताप, पोलिसाच्याच लगावली कानशिलात; गुन्हा दाखल

Next

जळगाव : डायल ११२ वर आलेल्या कॉलची दखल घेऊन कौटूंबिक न्यायालयात मदतीसाठी गेलेल्या बापुराव पिरा मोरे (वय ४६) या जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या अमलदाराच्याच कानशिलात लगावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आतिष दिनेश बारसे व अमित दिनेश बारसे (दोन्ही रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) या भावंडाविरुध्द मंगळवारी जिल्हा पेठ पोलिसात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, बापुराव मोरे जळगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असून सोमवारी त्यांना डायल ११२ या शासकीय पोलीस वाहनावर आरटीपीसी ड्युटी होती. सायंकाळी राजेश सुभाष पाटील (रा.कुरंगी, ता.पाचोरा) यांनी डायल ११२ वर कॉल करुन आम्हाला मारहाण होत असून मदत मागितली होती. त्या कॉलनुसार मोरे व हवालदार अय्युब पठाण बी.जे.मार्केटमधील कौटूंबिक न्यायालयात गेले. तेथे मोरे यांनी कोणी कॉल केला व काय मदत हवी अशी विचारणा केल्यावर राजेश पाटील पुढे आले. त्यांच्यासोबत त्यांची भाची गायत्री मच्छींद्र पाटील, रवींद्र भिका पाटील, बहिण दीपाली मच्छींद्र पाटील (सर्व रा.विखरण, ता.एरंडोल) असे होते.

पत्नीने घटस्फोट दिल्याचा संताप काढला

गायत्री हिचा आज न्यायालयात पती आतिष बारसे याच्यासोबत घटस्फोट झालेला आहे, त्यामुळे चिडून आतिष हा बहिण दिपाली हिच्या अंगावर धावून आला तर चुलत मेहुणे रवींद्र पाटील यांना मारहाण केली, तसेच तुम्ही खाली या पाहतोच अशी धमकी दिली, असे राजेश पाटील यांनी पोलिसांना सांगितले. त्यावर मोरे यांनी तुम्हाला पोलिसात तक्रार द्यायची आहे का? नसेल तर खाली सोडतो असे सांगितले. तक्रार द्यायची तयारी दर्शविल्याने मोरे यांनी या सर्वांना पोलीस वाहनात बसविले असता आतिष याने उजव्या बाजुचा दरवाजा जोरात उघडून गायत्री पाटील हिला हात धरुन बाहेर ओढले. त्यावर मोरे यांनी सरकारी वाहनाचा दरवाजा का उघडला असा जाब विचारला असता आतिष याने मोरे यांच्या कानशिलात लगावली त्यानंतर गायत्री हिच्या अंगावर धावून गेला. त्याचा भाऊ अमित याने देखील या पोलिसांशी धक्काबुक्की केली. यावेळी शहर पोलीव ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना मदतीसाठी बोलावून घेण्यात आले. तेथून या दोघं भावंडांना शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पहाटेच्या सुमारास दोघं भावंडाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.. 
 

Web Title: The anger of the wife's divorce was heard by the police in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.