चर्चाच जोरदार, झाकली मूठ गुपिताची; मुख्यमंत्र्यांचा मंगळवारी ‘हवाई’ दौरा!

By अमित महाबळ | Published: September 11, 2023 03:09 PM2023-09-11T15:09:15+5:302023-09-11T15:09:40+5:30

आंदोलनाच्या भीतीमुळे रस्त्याने प्रवास टाळला जात असल्याचे म्हटले जात आहे, तर पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी या चर्चेत तथ्य नसल्याचा दावा केला आहे.

The discussion is strong, covered with a handful of secrets; Chief Minister's 'air' tour on Tuesday! | चर्चाच जोरदार, झाकली मूठ गुपिताची; मुख्यमंत्र्यांचा मंगळवारी ‘हवाई’ दौरा!

चर्चाच जोरदार, झाकली मूठ गुपिताची; मुख्यमंत्र्यांचा मंगळवारी ‘हवाई’ दौरा!

googlenewsNext

जळगाव : राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन पुन्हा पेटले असून, मंगळवारी (दि. १२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्यात येत आहेत. संभाव्य दौऱ्यानुसार, ते विमानाने जळगावला येतील आणि येथून हेलिकॉप्टरने पाचोऱ्याकडे रवाना होतील. त्यांनी ३० किमी अंतरासाठी हवाई मार्ग निवडला आहे. त्याची जनतेत चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनाच्या भीतीमुळे रस्त्याने प्रवास टाळला जात असल्याचे म्हटले जात आहे, तर पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी या चर्चेत तथ्य नसल्याचा दावा केला आहे.

‘शासन आपल्या दारी’ या तालुकास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचा संभाव्य दौरा प्रशासानाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार ते जळगावला विमानाने येणार असून, विमानतळावरूनच हेलिकॉप्टरने पाचोऱ्याला रवाना होणार आहेत. त्यांना रस्त्याने जाण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र, त्याचा विचार करण्यात आलेला नाही. अशात मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटले असून, त्याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील नियोजनाशी जोडला जात आहे.

उगाच रिस्क नको म्हणून?
कोणतीही रिस्क नको म्हणून म्हणून विमानतळावरूनच ते थेट पाचोऱ्यातील जातील. रस्त्याने गेले असते, तर त्यांना अर्धा तास लागला असता, पण संपूर्ण मार्गावर बंदोबस्त ठेवण्याची, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतर्क राहण्याचे मोठे काम पोलिसांना लागले असते. हवाई मार्ग म्हटला म्हणजे हा ताण हलका होणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

असा आहे मार्ग
मात्र, पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार व मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किशोर पाटील यांनी या दौऱ्यात जळगाव ते पाचोरा हा रस्तामार्ग टाळण्यामागील चर्चा फेटाळून लावली आहे. सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री विमानाने जळगावला येतील. तेथून ते हेलिकॉप्टरने नांद्रा-पाचोरा रस्त्यावरील हडसन या ठिकाणी उतरतील. वाहनाने पाचोऱ्यात आल्यावर त्यांच्या उपस्थितीत दुपारी १२:३० वाजता कार्यक्रम सुरू होईल. दोन वाजेपूर्वी हा कार्यक्रम संपेल, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

- मुख्यमंत्री ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमानंतर आमदार किशोर पाटील यांच्याकडे नवीन फॅक्टरीचे उद्घाटन व जेवण आहे. ते झाल्यावर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनेच पुढील प्रवासासाठी जळगावला रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आमदार म्हणतात...
मुख्यमंत्र्यांना जळगावहून हेलिकॉप्टरने यायला १० ते १५ मिनिटे लागतील. यामुळे वाहतुकीचा प्रश्न उद्भवणार नाही. निवेदन देण्यास व भेटण्यास इच्छुक नसतील. रस्त्याने आले असते तर अर्धा तास लागला असता. वेळ वाचावा म्हणून ते हेलिकॉप्टरने येत आहेत. मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे, असेही आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

Web Title: The discussion is strong, covered with a handful of secrets; Chief Minister's 'air' tour on Tuesday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.