‘रेमण्ड’ कंपनीतील नव्या वेतन कराराचा वाद शमला, ७०० कामगारांनी लावली कामावर हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 08:18 PM2023-03-04T20:18:53+5:302023-03-04T20:19:14+5:30
'रेमण्ड'मधील उत्पादन प्रक्रिया नियमित झाल्याची माहिती
कुंदन पाटील, जळगाव: ‘रेमण्ड’ कंपनीतील नव्या वेतन कराराचा वाद शमल्यानंतर नवव्यादिवशी शनिवारी सातशेवर कामगारांनी कामावर हजेरी लावली आहे. त्यामुळे शनिवारी तीन शिफ्टमध्ये उत्पादन प्रक्रिया सुरु झाली आहे. परिमाणी रेमण्डमधील उत्पादन प्रक्रिया नियमित झाली असल्याचे सुत्रांच्यावतीने सांगण्यात आले.
शुक्रवारी कामगारांना सेवेत हजर राहण्यासंदर्भात ‘रेमण्ड’ने अल्टीमेटम दिला होता. त्यानुसार ५७५ कायमस्वरुपी सेवेत असणाऱ्या कामगारांसह ३०० कंत्राटी कामगार हजर झाले. त्यांच्याकडून हमीपत्र भरुन घेतल्यानंतर शुक्रवारी एका शिफ्टमध्ये कंपनीत उत्पादनाची निर्मिती करण्यात आली. शनिवारी सकाळी ७ वाजता पहिल्या शिफ्टमध्ये सेवेत असलेले सर्वच कर्मचारी हजर झाले. त्यानंतर दुपारी ३ वाजता दुसऱ्या शिफ्ट तर रात्री ११ वाजता तिसऱ्या शिफ्टमध्येही पुरेसे कामगारांचे बळ हजर झाल्याने उत्पादन प्रक्रियेची गाडी रुळावर आली आहे.