"सध्याच्या राजकारणाचे परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील"

By सुनील पाटील | Published: February 14, 2024 03:30 PM2024-02-14T15:30:16+5:302024-02-14T15:30:57+5:30

आमदार सत्यजित तांबे : एक वर्षाच्या कामगिरीचा मांडला लेखाजोखा

The future generation will have to suffer the consequences of the current politics, Satyajeet Tambe | "सध्याच्या राजकारणाचे परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील"

"सध्याच्या राजकारणाचे परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील"

जळगाव : सध्याची राजकीय परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. जे राजकारण सुरु आहे, त्याचे परिणाम माझ्या पीढीसह येणाऱ्या पीढीलाही भोगावे लागतील अशी चिंता व्यक्त करतानाच वैचारिक व प्रशासकीय स्थैर्याचा अभाव असल्याचे स्पष्ट मत आमदार सत्यजित तांबे यांनी बुधवारी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी त्यांनी एक वर्षाच्या कामगिरीचा आढावा सादर केला.

कॉग्रेसचे अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याशिवाय फोडाफाडीचे जे राजकारण सुरु आहे, त्यावर तांबे यांनी प्रत्येक वेळी परिस्थिती वेगवेगळी असते, आपण अर्थ काढतो तशी नसतेच. शेवटी कोणी कोणाला पकडून आणत नाही. ज्यांना यायचे ते सर्व विचार करुनच स्वत:पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात येतात. हे प्रकार आताच होतात असे नाही. याआधी देखील देशात व महाराष्ट्रात असे प्रयोग झालेले आहेत, आता तात्काळ होताच इतकाच फरक आहे. जळगावातून डॉ.उल्हास पाटील कॉग्रेस सोडून गेले, जिल्ह्यात पक्षाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे, या प्रश्नावर तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे, मी स्वत:च कॉग्रेस पक्षात नाही, त्यामुळे यावर बोलणे उचित नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत ३५० ते ४०० जागा येतील असा ठाम विश्वास भाजपला आहे, तर मग अशी फोडाफाडीची गरज का भासतेय या प्रश्नावर मात्र त्यांनी बोलणं टाळले. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फोडाफाडीच्या राजकारणावर जे मत व्यक्त केले, त्याचे मात्र त्यांनी समर्थन केले.
 
सरकसकट सर्वच मुलींना मोफत शिक्षण हवे

आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मागासवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमांची शंभर टक्के शैक्षणिक शुल्क हे आता राज्य शासन भरणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात नुकतीच घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे समर्थन करतानाच सरसकट सर्वच मुलींना मोफत शिक्षण मिळायला हवे असे मत तांबे यांनी व्यक्त केली.

Web Title: The future generation will have to suffer the consequences of the current politics, Satyajeet Tambe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.