आजी, माजी, संशोधक विद्यार्थ्यांशी 'नॅक' समितीने साधला संवाद, विविध विभागांनाही दिल्या भेटी

By सागर दुबे | Published: August 24, 2022 08:08 PM2022-08-24T20:08:34+5:302022-08-24T20:09:05+5:30

विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक आणि शिक्षक-कर्मचारी यांच्याशी समितीने संवाद साधला. तसेच विविध प्रशाळा व विभागांना भेटी दिल्या.  

The 'NAC' committee interacted with ex-students Present students and researchers and visited various departments in Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University | आजी, माजी, संशोधक विद्यार्थ्यांशी 'नॅक' समितीने साधला संवाद, विविध विभागांनाही दिल्या भेटी

आजी, माजी, संशोधक विद्यार्थ्यांशी 'नॅक' समितीने साधला संवाद, विविध विभागांनाही दिल्या भेटी

Next

जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नॅक पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या साखळीला सामोरे जात असून बुधवारी नॅक पिअर टीम समोर विद्यापीठाच्या प्रशासन, वित्त व लेखा विभाग आणि परीक्षा विभागाच्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक आणि शिक्षक-कर्मचारी यांच्याशी समितीने संवाद साधला. तसेच विविध प्रशाळा व विभागांना भेटी दिल्या.  

 नॅक पिअर टीम विद्यापीठात तीन दिवस असून बुधवारी दुसऱ्या दिवशी सकाळी या टीमसमोर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा. किेशोर पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी अनुक्रमे वित्त, प्रशासन आणि परीक्षा विभागाचे सादरीकरण केले. यानंतर माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बैठका घेवून संवाद साधला. त्यानंतर या समितीने आरोग्य केंद्र, केंद्रीय विद्यालय, मुलींचे वसतिगृह, शॉपींग कॉम्पलेक्स आदी ठिकाणी भेटी दिल्या.  

संचालकांशी केली चर्चा
शिक्षक भवन येथे माजी कुलसचिव व माजी परीक्षा नियंत्रक, माजी बीसीयुडी संचालक, माजी वित्त व लेखाधिकारी, प्रशाळा संचालक, अमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्र व गांधी तत्त्वज्ञान केंद्राचे संचालक यांच्याशी चर्चा केली. दुपारच्या सत्रात विद्यार्थी कल्याण, राष्ट्रीय सेवा योजना, ज्ञानस्त्रोत केंद्र आदी ठिकाणी भेटी दिल्या. त्यानंतर सर्व प्रशाळांना या समितीने भेटी देवून प्रत्यक्ष पाहणी केली.

Web Title: The 'NAC' committee interacted with ex-students Present students and researchers and visited various departments in Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.