उन्हाचे चटके वाढल्याने जळगाव जिल्ह्यात टँकरची संख्या वाढू लागली

By विजय.सैतवाल | Published: April 17, 2023 06:49 PM2023-04-17T18:49:39+5:302023-04-17T18:49:47+5:30

जळगाव : उन्हाचे चटके वाढत असताना जिल्ह्यात टँकरचीही संख्या वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यात चारवर असलेली ही संख्या सोमवार, ...

The number of tankers started increasing in Jalgaon district as the heat of summer increased | उन्हाचे चटके वाढल्याने जळगाव जिल्ह्यात टँकरची संख्या वाढू लागली

उन्हाचे चटके वाढल्याने जळगाव जिल्ह्यात टँकरची संख्या वाढू लागली

googlenewsNext

जळगाव : उन्हाचे चटके वाढत असताना जिल्ह्यात टँकरचीही संख्या वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यात चारवर असलेली ही संख्या सोमवार, १७ एप्रिल रोजी सहावर पोहचली आहे. सहा गावांना सहा टँकरने पाणीपुरवठा होत असून १२ विहिरीदेखील अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. 

गेल्या चार वर्षांपासून पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत असल्याने फारसी पाणी टंचाई जाणवत नव्हती. त्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून टंचाई आराखडादेखील मर्यादीत राहत होता. यंदाही  मार्चपर्यंत टँकरची संख्या फारसी वाढलेली नसली तरी आता एप्रिल महिन्यात ती वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात चार टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र आता यात दोन टँकरची भर पडली आहे. 

जामनेर तालुक्यातील मोरगाव, रोटवद, भडगाव तालुक्यातील तळबंदतांडा, बोदवड तालुक्यातील एनगाव, पारोळा तालुक्यातील हनुमंतखेडा, खेडीढोक या गावांमध्ये टॅंकर सुरू आहेत. या शिवाय जामनेर तालुक्यातील आठ, भुसावळ व भडगाव तालुक्यातील प्रत्येकी एक, पारोळा तालुक्यातील दोन गावांमध्ये विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. जळगाव तालुक्यातील लोणवाडी बुद्रुक व चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे प्रत्येकी एक तात्पुरती पाणीपुरवठा योजना सुरू आहे.

Web Title: The number of tankers started increasing in Jalgaon district as the heat of summer increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव