पहिल्या चार तासातील मतदानाच्या टक्केवारी नंदुरबार अव्वल! शिरुर पिछाडीवर : जालना दुसऱ्यास्थानी तर रावेर तिसऱ्यास्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:01 PM2024-05-13T12:01:59+5:302024-05-13T12:02:07+5:30
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. नंदुरबार, रावेर, जळगाव, शिरुर, अहमदनगर, जालना, छ.संभाजीनगर, पुणे, मावळ, बीड आणि शिर्डी मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.
कुंदन पाटील
जळगाव : लोकसभेसाठी सोमवारी मतदान प्रक्रियेला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली आहे. सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेदरम्यान, या चार तासात सर्वाधिक मतदान नंदुरबार मतदारसंघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापाठोपाठ जालना व रावेरने आघाडी घेतली आहे.शिरुर मात्र पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. नंदुरबार, रावेर, जळगाव, शिरुर, अहमदनगर, जालना, छ.संभाजीनगर, पुणे, मावळ, बीड आणि शिर्डी मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या चार तासात मतदानाचा टक्का नंदुरबारमध्ये सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले. नंदुरबारमध्ये भाजपच्या डॉ.हीना गावीत आणि कॉंग्रेसच्या ॲड.गोविल पाडवी यांच्यात लढत होत आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभा झाल्या होत्या. त्यामुळे नंदुरबारची लढत प्रतिष्ठेची बनली आहे.
पहिल्या चार तासातील मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
नंदुरबार - २२.१२ टक्के
जळगाव- १६.८९ टक्के
रावेर - १९.०३ टक्के
जालना - २१.३५ टक्के
औरंगाबाद - १९.५३ टक्के
मावळ -१४.८७ टक्के
पुणे - १६.१६ टक्के
शिरूर- १४.५१ टक्के
अहमदनगर- १४.७४ टक्के
शिर्डी -१८.९१ टक्के
बीड - १६.६२ टक्के