जळगाव : राज्यातील १४ पालिकांमध्ये सदस्यसंख्या निश्चितीची प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 06:12 PM2023-04-10T18:12:25+5:302023-04-10T18:12:32+5:30
सदस्य संख्या निश्चीत करण्यासाठी २०११ ची जनगणना गृहित धरली जाणार आहे.
कुंदन पाटील
जळगाव : २०२३ मध्ये मुदत संपत असलेल्या राज्यातील १४ नगरपालिकांमधील सदस्यसंख्या निश्चीत करण्यासंदर्भात प्रक्रियेला प्रारंभ करण्याचे निर्देश राज्य निवडणुक आयोगाने दिले आहेत. देवरुख, गुहागर(रत्नागिरी), कणकवली (रत्नागिरी), जामनेर, मुक्ताईनगर (जळगाव), वैजापूर (औरंगाबाद), आजरा (कोल्हापूर), भोर, वडगाव (पुणे), बार्शी-टाकळी (अकोला), पारशिवनी, वनडोंगरी (नागपूर), भद्रावती (चंद्रपूर) व शिरोळ (कोल्हापूर) या पंचायत, परिषदांचा त्यात समावेश आहे.
२०११ ची जनजगणा गृहित
सदस्य संख्या निश्चीत करण्यासाठी २०११ ची जनगणना गृहित धरली जाणार आहे. तसेच मागासवर्गीय आयोगाने निश्चीत केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागांची गणना केली जाणार आहे. तसेच महिलांसाठी ५० टक्के जागा रिक्त होणार आहेत.
रचना कायम राहणार
पालिका हद्दीतील कुठलाही भाग न वगळता आणि कुठलाही भाग नव्याने समाविष्ट न करता रचना कायम ठेवली जाणार आहे. त्यानुसार आरक्षणनिहाय सदस्य संख्या निश्चीत केली जाणार आहे.