'बायको नांदत नाही तो पण माणूस आमच्याकडे येतो', मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाने गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 11:47 PM2022-08-28T23:47:26+5:302022-08-28T23:49:30+5:30

मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे, स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात केले आहे

The wife does not cry but the man comes to us, Minister Gulabrao Patal's statement stirs excitement | 'बायको नांदत नाही तो पण माणूस आमच्याकडे येतो', मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाने गोंधळ

'बायको नांदत नाही तो पण माणूस आमच्याकडे येतो', मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाने गोंधळ

Next

जळगाव - शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्रीगुलाबराव पाटील त्यांच्या बिनधास्तपणा आणि हटके भाषण शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर त्यांनी शिवसेना नेत्यांवर चांगलीच टोलेबाजी केली होती. विशेष म्हणजे शेरो-शायरीतून त्यांनी अनेकांना टोला लगावला. तर, गद्दार म्हणणाऱ्यांनाही प्रत्युत्तर दिलं होतं. नुकतेच त्यांनी ५० खोके म्हणून डिवचणाऱ्यांना सुनावले. तर, जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त विधान केलं. आम्ही जनरल फिजीशियन असून बायको नांदत नाही, असं सांगणाराही माणूस आमच्याकडे येतो, असे त्यांनी म्हटलं.

मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे, स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्रीगुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात केले आहे. तसेच, डॉक्टरांचं डोकं एका फॅकल्टीचं असतं. मात्र, आमचे डोकं असं असते की आमच्यासमोर बसलेल्यांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. पण, आम्ही ऐकणारे एकटे असतो. आम्ही जनरल फिजिशियन आहोत.  बायको नांदत नाही तो पण माणूस आमच्याकडे येतो, असेही वादग्रस्त विधान गुलाबराव पाटील यांनी केलं. आधीच शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे मंत्री पाटील यांना ट्रोल केलं जात आहे. त्यातच, वादग्रस्त विधान केल्याने त्यांनी विरोधकांच्या हाती आयतं कोलीत दिलं आहे.

दरम्यान, विरोधकांकडून आणि सोशल मीडियातून होत असलेल्या 50 खोके, एकदम ओके, या टिकेचाही पाटील यांनी समाचार घेतला होता. टिकाकारांना एकप्रकारे त्यांनी चलेंजच केलं आहे.

तर ९ व्या दिवशी मंत्रीपद सोडेन

मंत्री होणे आमच्या पंजोबांच्याही नशिबात नव्हते. मात्र, आम्ही मंत्री झालो. लोकांना वाटतं पुढार्‍यांची मजा आहे. आणि त्यातच आता 50 खोके सर्व ओके, अशा नव-नवीन घोषणा निघाल्या. पण, ज्यांना असं वाटत असेल की मंत्री झाल्यावर पोत्यांनी भरून पैसा मिळतो. त्यांनी आठ दिवस आमच्याबरोबर राहून पहा. नवव्या दिवशी तो व्यक्ती आमच्या जागेत बसला तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ, असं थेट चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे. दरम्यान, विरोधकांकडून सातत्याने ५० खोके घेतल्याचा आरोप शिंदे गटातील आमदारांवर करण्यात येत आहे.
 

Web Title: The wife does not cry but the man comes to us, Minister Gulabrao Patal's statement stirs excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.