बनावट चावी, सीसीटीव्हीचं मेमरी कार्डही तोडलं; दुकानातील कामगारानेच लांबविले सात लाखांचे कपडे
By सुनील पाटील | Published: October 11, 2022 03:44 PM2022-10-11T15:44:54+5:302022-10-11T15:45:42+5:30
१२ लाख रुपयांचे टी शर्ट व इतर कपडे आणून ते गोदामात ठेवलेले होते.
जळगाव : दुकानात काम करणाऱ्या कामगाराने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने गोदामाच्या कुलूपाची बनावट चावी तयार करुन सात लाख २२ हजार ८८० रुपये किमतीचे कपडे लांबविल्याची घटना बळीराम पेठेत घडली आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये यासाठी त्यांनी मेमरीकार्ड तोडले आहे. याप्रकरणी लक्की गिडवानी, आकाश फब्यानी व अन्वर मेमन (तिघे रा.भुसावळ) या तिघांविरुध्द मंगळवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल किसन बजाज (वय ३३, रा.सिंधी कॉलनी) यांचे बळीराम पेठेत विधाता मार्केटमध्ये पहिल्या मजल्यावर शिवम कलेक्शन नावाचे कापड विक्री दुकान आहे. दुकानापासून ५०० मीटर अंतरावर १५ नंबर शाळेजवळ गोदाम आहे. या गोदामात कपडे ठेवलेले असतात. दुकानातील कपडे संपल्यावर तेथून आणले जातात. दुकानात लक्की गिडवानीसह चार तरुण कामाला आहेत.
१२ जुलै रोजी पंजाबमधून १२ लाख रुपयांचे टी शर्ट व इतर कपडे आणून ते गोदामात ठेवलेले होते. या कपड्यांची विक्री होत नसल्याने पंजाब मेलने ते परत केले जाणार होते.