पारोळ्यात तिसऱ्या दिवशीही घरफोडी, दुचाकी घेऊन पोबारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 01:25 PM2018-04-22T13:25:49+5:302018-04-22T13:28:11+5:30
चोरीचे सत्र सुरूच
आॅनलाइन लोकमत
पारोळा, जि. जळगाव, दि. २२ - शहरात घरफोडीचे सत्र सुरू असून सलग तिसºया दिवशी घरफोडी झाल्याने घबराट पसरली आहे. तलाठी कॉलनीत एका ठिकाणी व आनंद नगर येथे एका ठिकाणी अशा दोन ठिकाणी चोरट्यांनी चोरी केली.
तलाठी कॉलनीतील रहिवाशीव पारोळा जिल्हा बँक कर्ज वाटप पारोळा शाखेचे कर्मचारी सुधाकर भावलाल पाटील यांची २१ रोजी रात्री ८ वाजता आचनक तब्बेत बिघडल्याने त्यांना तात्काळ धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि घर बंद करून सर्व जण धुळे येथे गेले. या संधीचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला आणि घराचा दरवाजाचा तोडून घरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले या वेळी उपचारासाठी बँकेतून आणलेले पैसे सुधाकर पाटील यांच्या पत्नीने सोबत घेतले होते या मुळे चोरट्यांना काही मिळाले नाही. नंतर चार घरे सोडून बंद घराकडे आपला मोर्चा वळवला आणि त्यांच्या बंद घराचा कडी कोंडा तोडला आणि घरात प्रवेश करून कपाट व तिजोरी फोडली. सदर घरमालक पुणे येथे लग्नाला गेले असल्याने किती माल चोरट्यांनी चोरून नेला याची माहिती मिळू शकली नाही. परंतु चोरट्यांनी या घरी लावलेली मोटारसायकल घेऊन ते मात्र पसार झाले. मोंढले प्र अ महामार्गावर मोटारसायकलचे पेट्रोल संपल्यावर तेथे मोटारसायकल सोडून पसार झाले
या आधी संजय मराठे व जगदीश आफ्रे यांचा कडे घरफोडी झाल्याचा तपास मात्र शून्य आहे