रंगभूमीचा नायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 02:18 PM2018-08-25T14:18:09+5:302018-08-25T14:18:33+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘वेध नाटकाचा’ या सदरात रंगभूमीचे अभ्यासक डॉ.हेमंत कुलकर्णी लिहिताहेत...

Theater hero | रंगभूमीचा नायक

रंगभूमीचा नायक

Next

नायक म्हटला की डोळ्यासमोर एक धिरोदात्त व्यक्तिमत्त्व उभे राहते. भव्य देहयष्टी, देखणा चेहरा, धारदार नजर, चपळ हालचाल, करडा स्वर इ. असे अनेक गुणांनी युक्त असा नायक आपल्या डोळ्यासमोर येतो. कारण तसंच आहे. आजवर आपण पाहिलेल्या सिनेमा, नाटकातून नायक असेच असायचे आणि आहेत आणि अशा नायकाची दाखवलेली कॉमेडी, ट्रॅजेडी ही प्रेक्षकांना भावते. सर्वसामान्य दिसणाऱ्या आणि असणाºया नायक नामे व्यक्तीची ट्रॅजेडीही तेवढी उदात्त वाटत नाही. कारण सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यात असं काही घडतच नाही, असा एक सर्वमान्य समज; तर असा नायक सतत कलाकृतीतून बघण्याची आम्हाला सवय आहे. त्यामुळे नाटक असो की सिनेमा याचा नायक कोण, हा प्रश्नच खरेतर उद्भवायला नको.
नायक म्हणजे कोण? तर जो त्या कथानकातील प्रमुख अशी व्यक्ती, जिच्याभोवती नाटकाचे कथानक गुंफलेले असते. त्या कथेत घडणाºया प्रत्येक गोष्टीला तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जबाबदार असतो. पण या नायकाबाबत जरा आर्थिक वेगळा विचार केला तर असे लक्षात येते की, हा नायक नसून त्या कलाकृतीतील शेवटची व्यक्ती आहे. एखाद्या शोरूममधील विंडोमध्ये ठेवलेल्या शो पीससारखी आहे. कारणही तसंच आहे. या नायकाचे किंवा त्या कलाकृतीत वावरणाºया कोणत्याही भूमिका करणाºया नटाचे/नटीचे स्थान हे शेवटचे आहे. कारण असे की तो जे काही संवाद म्हटतो ते दुसºयाने लिहिलेले असतात. त्याला दिलेल्या हालचाली या दिग्दर्शकाच्या असतात. त्याच्या भोवती उभे केलेले वातावरण हे नेपथ्यकाराने निर्माण केलेले असते. त्याच्या अंगावर चढवलेले कपडे हे वेशभूषाकाराने दिलेले असतात. त्याच्या चेहºयावर रंग हा रंगभूषाकार लावतो. रंगमंचावर त्याच्यावर प्रकाश टाकतो. तो प्रकाशयोजनाकार त्याच्या संवादांना, भावनाप्रकटनाला उठाव देतो तो संगीतकार. या सगळ्यांची मदत घेत तो आपली कला प्रगट करतो. यातला एक जरी घटक वगळला तर त्याचे अभिनय नामक कार्य अपूर्ण राहते.
मग पुन्हा प्रश्न येतो की मग नायक कोण? तर या नायकाचा नायक हा त्या नाटकाचा लेखक आहे. जो प्रेक्षकांना दिसत नाही पण ही सर्व नाट्यकृती ज्याची खरी सृजनशिल निर्मिती असते तो नायक आहे. जो नाटक जन्माला घालतो, ते नाटक मनाच्या रंगमंचावर सर्वप्रथम तो पहातो आणि मग आपल्या शब्दांच्या माध्यमातून तो कागदावर साकारतो. त्याचे हे कार्य केवळ लिहून संपत नाही तर जेव्हा हे रंगमंचावर प्रत्यक्ष जेव्हा सादर होते तेव्हा त्यास पूर्णत्व येते. त्या नाटकात काम करणारे नट, तंत्रज्ञ हे बदलत जातात पण लेखक मात्र तोच असतो. काळाच्या ओघात असे नट विस्मरणातही जातात, पण नाटक ही कागदावर लिहून ठेवलेली कलाकृती ही अजरामर असते.
आजही संस्कृत रंगभूमीवर, ग्रीक रंगभूमीवर, पाश्चिमात्य रंगभूमीवर सादर झालेल्या एवढंच काय तर जगातील कोणत्याही भाषेतील रंगभूमीवरील लिखित नाटकांच्या संहिता आपण वाचू शकतो, शेक्सपिअरची नाटके आजही आपल्याला सहज उपलब्ध आहेत. पण याच नाटकांमधून भूमिका केलेल्या नटांच्या फारतर आठवणी (अर्थात त्या कोणी लिहिल्या/चित्रित केल्या असतील तर) जागवता येतात. अलीकडच्या आधुनिक तंत्रज्ञानाने नाटकाचे चित्रीकरण करून ठेवता येते जे की पुढच्या पिढीला बघता येईल. पण त्या पुनर्निर्मितीची प्रक्रिया नसते.
लेखकाच्या नाटकावर अशी निर्मितीची प्रक्रिया वारंवार करता येते. अर्थात ते त्या नाट्यकृतीच्या गुणवत्तेवर त्यातील समकालीन मूल्यांवर अवलंबून आहे आणि म्हणूनच नाटकाचा खरा नायक हा त्या नाटकाचा लेखक आहे. त्याची सर्वमान्य कलाकृती ही त्याच्या पृथ्वीतलावरील अस्तित्वाची खरी निशाणी आहे. अनेक नट येतील जातील, अनेक दिग्दर्शक, तंत्रज्ञांचे थोर कार्य विस्मरणात जाईल पण रंगभूमीच्या या लेखक रूपी नायकाचे स्थान या कलेच्या जगात चिरंतन आहे व राहील.
-डॉ.हेमंत कुलकर्णी, जळगाव

Web Title: Theater hero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.