भुसावळ येथे पशुवैद्यकीय दवाखान्यातून २६ फाईल्सची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:42 AM2018-10-06T01:42:49+5:302018-10-06T01:43:29+5:30

जिल्हा परिषदच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कपाटातील तब्बल २६ फाईलची चोरी झाली

 Theft of 26 files from a veterinary dispensary at Bhusawal | भुसावळ येथे पशुवैद्यकीय दवाखान्यातून २६ फाईल्सची चोरी

भुसावळ येथे पशुवैद्यकीय दवाखान्यातून २६ फाईल्सची चोरी

Next
ठळक मुद्देजि.प.व पं.स.मध्ये खळबळशहर पोलिसात गुन्हा दाखल

भुसावळ : शहरातील यावल रोडवरील जिल्हा परिषदच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कपाटातील तब्बल २६ फाईलची चोरी झाली असल्याची फिर्याद पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सलीम बशीर तडवी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात भाग ५ गुन्हा रजिस्टर नंबर ७४/१८ भादंवि कलम ४५४, ५५७, व ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी रात्री आठ वाजेनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कॅबिनजवळील लोखंडी गज कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला आहे, तर भिंतीला असलेल्या लाकडी कपाटातून या फाईल लांबल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, दवाखान्यातील फाईल लांबल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती वतुर्ळात एकच खळबळ उडाली आहे तर चोरटे जिल्हा परिषदेच्या रेकॉर्डला करतील तरी काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
या फाईल्स चोरट्यांनी लांबवल्या की रेकॉर्ड नष्ट करण्यासाठी काही कर्मचाºयांचे कट कारस्थान आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.


 

Web Title:  Theft of 26 files from a veterinary dispensary at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.