गौरखेडा शिवारात २० क्व्ािंटल केळीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 06:58 PM2019-10-05T18:58:49+5:302019-10-05T18:59:50+5:30
गौरखेडा शिवारातून ४ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी २० ते २२ क्विंटल वजनाचे सुमारे १२५ केळीचे घड कापून चोरून नेले.
चिनावल, ता.रावेर, जि.जळगाव : येथील शेतकरी शेख इरफान हाजी कुतुबुद्दीन यांच्या येथून जवळच असलेल्या गौरखेडा शिवारातून ४ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी २० ते २२ क्विंटल वजनाचे सुमारे १२५ केळीचे घड कापून चोरून नेले. काही माल तेथेच सोडून चोरट्यांनी पलायन केले.
गौरखेडा शिवारातील शेख इरफान यांच्या केळी बागेतून रात्री सुमारे शंभर ते सव्वाशे केळी घड कापून चोरून नेत चोरट्यांनी डल्ला मारला आहे. यामुळे या शेतकºयाचे ४० ते ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
या घटनेची फिर्याद शेख इरफान यांनी सावदा पोलिसात दिली आहे. दरम्यान, चिनावल, गौरखेडा, वडगाव, वाघोदा या शिवारात नेहमीच केळी खोडांची मोठ्या प्रमाणात चोरी होते.
चोरीचा माल परिसरातील काही व्यक्ती रेल्वेद्वारे मुंबईकडे घेऊन जातात. या प्रकाराला परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रासले आहेत. पोलीस प्रशासन तसेच रेल्वे प्रशासनाने चोरीचा केळी माल वाहून नेणाºया वाहन तसेच ज्या गाडीतून हा माल जातो त्या गाड्यांवर लक्ष ठेवून चोरट्यांंवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.