जुने जळगावातील विठ्ठल मंदिरातून मुकुटांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 09:22 PM2018-08-25T21:22:52+5:302018-08-25T21:24:40+5:30

जुने जळगावामधील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरातील विठ्ठल व रूख्मिणी यांचे चांदीचे मुकूट व कुंडले चोरट्यांनी भरदिवसा लांबविल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़

Theft of the crown from the old temple of Vitthal in old Jalgaon temple | जुने जळगावातील विठ्ठल मंदिरातून मुकुटांची चोरी

जुने जळगावातील विठ्ठल मंदिरातून मुकुटांची चोरी

googlenewsNext
ठळक मुद्देजुने जळगावातील भरदुपारची घटनामहादेवच्या मंदिरात पुजेसाठी गेले अन् चोरट्यांनी संधी साधलीजळगाव शहरात चोऱ्या व घरफोड्यांचे सत्र सुरुच

जळगाव- जुने जळगावामधील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरातील विठ्ठल व रूख्मिणी यांचे चांदीचे मुकूट व कुंडले चोरट्यांनी भरदिवसा लांबविल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ मंदिरातील पुजारी समोरच असलेल्या महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेले असता अवघ्या पाच मिनिटात चोरट्याने चोरी केली.
गेल्या १५ दिवसांपासून शहरात चोºया व घरफोड्यांचे सत्र सुरु आहे. दररोज शहरात किमान एक चोरी अथवा घरफोडीची घटना घडत असून चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.
जुने जळगावात विठ्ठल-रूख्मिणी यांची मूर्ती असलेले पुरातन मंदिर आहे़ या ठिकाणी अनेक वर्षांपासून रथ चौकातील राजेंद्र जोशी हे पुजारी आहेत़ नेहमीप्रमाणे जोशी हे मंदिरात आरतीसाठी आले दुपारी १ वाजता आरती आटोपल्यानंतर गाभाºयाच्या दरवाज्याला कडी लावून मंदिराबाहेर समोरच असलेल्या महादेवाच्या मंदिरात पुजेसाठी गेले़ तेवढ्यात अज्ञात चोरट्याने विठ्ठल व रुख्मिणी यांच्या डोक्यावरील चांदीचे मुकूट तसेच कुंडलेही चोरून नेले़ पाच मिनिटांनी जोशी पूजा आटोपून मंदिरात आल्यावर त्यांना गाभाºयाचा दरवाजा उघडा दिसला़ अन् चांदीचे मुकूट व कुंडलेही चोरीला गेल्याचे दिसून आले़ त्यांनी त्वरित शेजारी असलेले डॉ़ विश्वनाथ खडके यांना बोलवून मुकूट चोरीला गेल्याची माहिती दिली़ डॉ.खडके यांनी शनिपेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली़

Web Title: Theft of the crown from the old temple of Vitthal in old Jalgaon temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.