वीज चोरी करणा:या 44 जणांना महावितरणचा शॉक

By admin | Published: May 7, 2017 05:47 PM2017-05-07T17:47:00+5:302017-05-07T17:47:00+5:30

जळगाव तालुक्यात महावितरण कंपनीची धडक कारवाई.

Theft of electricity: these 44 people shock the MSEDCL | वीज चोरी करणा:या 44 जणांना महावितरणचा शॉक

वीज चोरी करणा:या 44 जणांना महावितरणचा शॉक

Next

 जळगाव,दि.7- तालुक्यातील शिरसोली, रामदेववाडी, वावडदा व पाथरी परिसरात महावितरणच्या अधिका:यांनी रविवारी सकाळीच धाडसत्र राबविले. त्यात वीज चोरी करताना 44 जण आढळून आले. त्यांच्याविरुध्द कलम 126/135 अन्वये कारवाई करण्यात आली. दरम्यान, पथक पोहचताच प्रत्येक गावातील वीज चोरटय़ांनी आकोडे काढून पळापळ केली. 

वावडदा येथील कनिष्ठ अभियंता कुणाल महाजन, वरिष्ठ तंत्रज्ञ अशोक बारी व रामकृष्ण बारी यांच्यासह दहा जणांच्या पथकाने रविवारी सकाळी रामदेववाडीपासून कारवाईला सुरुवात केली. वावडदा ते पाथरी दरम्यान प्रत्येक शेतात तसेच आस्थापनाची तपासणी केली असता पानटपरी,रसवंती चालक वीज चोरताना आढळून आले. त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान, कारवाईची कुणकुण लागताच वावडदा, शिरसोली, पाथरी व वडली या गावातील वीज चोरांनी आकोडे काढून घेतले. वरिष्ठ अधिका:यांनीही कारवाईचा आढावा घेतला.

Web Title: Theft of electricity: these 44 people shock the MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.