स्वत:च्याच कंपनीत केली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:55 PM2019-11-02T12:55:10+5:302019-11-02T13:10:51+5:30

फिल्ड अधिकाऱ्याने केली १२ लाखांची चोरी, सहा जणांना अटक

Theft in his own company | स्वत:च्याच कंपनीत केली चोरी

स्वत:च्याच कंपनीत केली चोरी

googlenewsNext

जळगाव : बोदवड येथील नम्र फायनान्स लिमिटेड कंपनीत १२ लाख ८ हजार रूपयांचा ऐवजावर डल्ला मारणाºया टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले आहे. सहा जणांना अटक करण्यात आली आहे़ यात कंपनीतीलच फिल्ड अधिकारी सुनील इंगळे याने साथीदारांच्या मदतीने ही चोरी घडवून आणल्याचे उघड झाले आहे़ व्यवस्थापक मनोज धर्मराज माळी हा या चोरीतील मास्टरमार्इंंड आहे. त्यानेच या घटनेबाबत फिर्याद दिली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पोलीस निरिक्षक बापू रोहोम यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली़
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नम्र फायनान्स कंपनीतील चोरीप्रकरणी फिल्ड अधिकारी सुनील कडू इंगळे (रा़ निमखेडी बु, ता़ मुक्ताईनगर), त्याचे साथीदार किसन उर्फ शेंड्या कैलास सोनवणे, विलास मधूकर पवार, प्रवीण सुखा धुलकर उर्फ लहाण्या, गणेश सोपान पवार, प्रदीप किशोर सोनवणे (सर्व रा़ बोदवड) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
अशी घडली घटना
बोदवड शहरातील जामठी रस्त्यावर नम्र फायनान्स लिमिटेड ही कंपनी आहे़ १३ आॅक्टोबर रोजी कंपनीत अमोल मोरे हा कर्मचारी झोपलेला होता़ त्यावेळी कंपनीचा दरवाजा बंद करण्यास अमोल यास विसर पडला़ हीच संधी साधत मध्यरात्री सहा चोरट्यांनी कंपनीत प्रवेश करीत कपाटातील १२ लाख ८ हजार २५२ रूपयांचा ऐवज लंपास केला़ तत्पूर्वी या भामट्यांनी जवळच असलेल्या किराणा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा फोडले़ हा प्रकार १४ आॅक्टोबरला उघड झाल्यानंतर कंपनीतील व्यवस्थापक मनोज धर्मराज माळी यांनी बोदवड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़
कुणी घेतली दुचाकी तर कुणी मोबाईल
चोरीतील संशयितांनी पैशांची समान वाटणी करीत चांगलीच दिवाळी साजरी केली़
यामध्ये एकाने महागडी दुचाकी तर दुसरयाने मोबाईल विकत घेतला़ काहींनी स्वत:वर असलेले कर्जाची फेड केली तर कुणी उधारीचे पैसे दिले असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे़
दुचाकी, मोबाईल हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून अटक करण्यात आलेल्या सहाही संशयितांकडून दुचाकी, ७० हजार रूपये रोख, एक मोबाईल असा १ लाख ५७ हजार रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे़
ही कारवाई पोलीस निरिक्षक बापु रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पथकातील पोलीस उपनिरिक्षक सुधाकर लहारे, अशोक महाजन, रवींद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, गफुर तडवी, दीपक पाटील, रणजित जाधव, इंद्रीस पठाण, अशोक पाटील, मुरलीधर बारी, शरद भालेराव, संदीप सावळ, वहीदा तडवी, वैशाली महाजन आदींनी केली आहे़ या चोरट्यांचा मुक्ताईनगर, बोदवड, बुलढाणा, मलकापूर आदी ठिकाणीही शोध घेण्यात आला होता़

Web Title: Theft in his own company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.