मुक्ताईनगर पोलीस वसाहतीत लावलेल्या कंटेनरचे साहित्य चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 10:33 PM2018-12-09T22:33:52+5:302018-12-09T22:34:58+5:30
मुक्ताईनगर , जि.जळगाव : गुरांची बेकायदा वाहतूक केल्या प्रकरणात जप्त करून पोलीस वसाहतीच्या आवारात लावण्यात आलेल्या कंटेनरवर हात साफ ...
मुक्ताईनगर, जि.जळगाव : गुरांची बेकायदा वाहतूक केल्या प्रकरणात जप्त करून पोलीस वसाहतीच्या आवारात लावण्यात आलेल्या कंटेनरवर हात साफ करुन कंटेनरचे टायर, बॅटरी व डिझेल चोरुन नेल्याप्रकरणी मुक्ताईनगर येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, मुक्ताईनगर तालुक्यातून गुरांची अवैधरित्या वाहतूक करणारे कंटेनर क्रमांक (आर.जे.०९-सी.जी.२८६१) हे गुन्ह्यात जप्त केलेले आहे. हे कंटेनर मुक्ताईनगर येथील पोलीस वसाहतीच्या आवारात लावलेले होते. मुक्ताईनगर येथील प्रभात गोसावी व मुकेश सोनवणे या दोघा युवकांनी ३ ते २७ नोव्हेंबर या दरम्यान कंटेनरमधील सहा टायर (किंमत अंदाजे रक्कम ७२ हजार), दोन बॅटºया (रक्कम ५६०० रुपये) व ८० लीटर डिझेल (रक्कम १६ हजार) असा मुद्देमाल चोरुन नेला होता.
याप्रकरणी हवालदार मुकेश घुगे यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोघ आरोपींना ६ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. १० डिसेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. दोघा आरोपींनी चोरुन नेलेला मुद्देमाल पोलिसांना काढून दिला आहे. तपास उपनिरीक्षक नीलेश सोळुंके करीत आहे.