तीन लाखांच्या पंपांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 08:40 PM2019-05-29T20:40:44+5:302019-05-29T20:41:17+5:30

कुलूप तोडले : तोंडापरच्या पाणी योजनेवर मारला डल्ला

Theft of three lakh pumps | तीन लाखांच्या पंपांची चोरी

तीन लाखांच्या पंपांची चोरी

Next

तोंडापूर, ता. जामनेर : येथील १७ गाव पाणीपुरवठा योजनेच्या फिडरवरुन २ लाख ८० हजार रुपयाच्या विद्युत पंपांची चोरी झाली. ही बाब बुधवारी सकाळी लक्षात आली.
तोंडापूर येथे दहा वर्षापूर्वीची जिल्हा परिषद अंतर्गत ही पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती.मात्र जिल्हा परीषदेच्या भोगळ कारभारामुळे ही चोरी झाली. उंच टेकडीवर हे पाणी शुध्दीकरण केंद्र साकारण्यात आले. या योजनेत तोंडापूरसह वाकोद, ढालगांव, ढालसींगी, किन्ही, लोणी, फत्तेपूर, शेवगा, चिंचोली आदी १७ गावांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र पिंपळगाव व गोद्री धरण झाल्याने फत्तेपुरसह चिंचोली, लोणी, शेवगा तोंडापूर यासारखी गावे या योजनेतुन बाहेर निघाली.त्यामुळे जिल्हा परीषदेच्या ताब्यात आसलेल्या या योजनेवर होणारा खर्च परवड त नसल्याने त्यांनी सहा गावे मिळुन एक समीती नेमून राजाराम सुक्राम उगले हे ढालगावचे सरपंचपदी असातांना अध्यक्ष झाले तर फत्तेपुर, किन्ही, ढालसींगी येथील काही ग्रामपंचायत सदस्य मिळून समिती स्थापन करण्यात आली. आणी संपूर्ण जबाबदारी ही समीतीवर सोपवली. मात्र समीतीने या योजनेच्या संरक्षणासाठी केवळ एकच वॉचमन ठेवला.त्यालाही वेळेवर पराग नसल्याने लाखो रुपये खर्च करण्यात आलेली योजना ही बेवारस झाली. येथील पाणी फिल्टर करणारे सुमारे एक लाख वीस हजारो आठ विद्युतपंप व एक लाख साठ हजाराचे चार मोठे विद्युत पंप अशी चोरी झाली आहे. चोरट्यांनी कुलुप तोडुन बंद खोलीतील पाणी सोडण्याचे हँडल, लोखंडी पाईप, तांब्याच्या तारा, इत्यादी किरकोळ साहित्याचीही चोरी झाल्याचे समीती अध्यक्ष राजमल उगले यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी सांगितले की, सदस्याना कळविले मात्र कोणीही येण्यास तयार नसल्याने मी ऊद्याला याची माहीती पोलीसात देणार आहे, असे राजाराम उगले यांनी ‘ लोकमत’ शी बोलताना सांगितले.

Web Title: Theft of three lakh pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.