अमळनेर येथे बोरी पात्रावर पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:00 AM2019-06-17T00:00:22+5:302019-06-17T00:03:23+5:30

अमळनेर शहरातील सानेनगर परिसरात बोरी पात्राजवळ काहींनी अतिक्रमित जागी बेकायदा विहिरी खोदून दुष्काळात पाणी विकण्याचा प्रकार सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे.

Theft of water on a sack at Amalner | अमळनेर येथे बोरी पात्रावर पाण्याची चोरी

अमळनेर येथे बोरी पात्रावर पाण्याची चोरी

Next
ठळक मुद्देअतिक्रमित विहिरी खोदून केला जातोय प्रकारशेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

अमळनेर, जि.जळगाव : शहरातील सानेनगर परिसरात बोरी पात्राजवळ काहींनी अतिक्रमित जागी बेकायदा विहिरी खोदून दुष्काळात पाणी विकण्याचा प्रकार सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. नाल्याद्वारे वाहून येणारे शहरातील सांडपाणीही बंधा-याद्वारे अडवून विहिरींत टाकले जात आहे. याबाबत नंदगाव, सानेनगर, तांबेपुरा व अमळनेर परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
या निवेदनात नमूद केल्यानुसार, सानेनगरपुढील बोरी नदीपात्र ते नंदगाव व ठाकूरसिंहजी मानव केंद्रामागील नदीकाठच्या (किनारपट्टी) भागात काही पाणीचोरांंनी वैयक्तिक फायद्यासाठी नदीच्या किनारपट्टीवर बेकायदा अतिक्रमण करून विहिरी खोदल्या आहेत.
या पाण्याचा उपयोग ते शेतीसाठी तसेच विक्रीसाठी करतात. नदी, नाला व शहरातून वाहून येणारे सांडपाणीदेखील वळसा, बंधारा याद्वारे अडवून बेकायदेशीरपणे खोदलेल्या अतिक्रमित विहिरींमध्ये टाकले जात आहे. या विहिरींतील पाणी मोटारींच्या साह्याने पाइपलाइनद्वारे विकले जात आहे. यासाठी कुठलीही शासकीय परवानगी न घेता रस्ते खोदून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. यामुळे परिसरातील सर्व विहिरी व बोअर कोरडे पडले असून, पशुधनासाठी पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी चोरी करणारांना शेतकºयांनी मज्जाव केला असता त्यांना ठार मारण्याची धमकी दिली जात असल्याचे परिसरातील शेतकºयांनी सांगितले.
निवेदनावर हिरालाल पाटील, हिंमत वामन पवार, गणेश पाटील, पीयूष शर्मा, संतोष पाटील, योगेश पाटील, सदाशिव पाटील, विनायक पाटील, गणेश पाटील, प्रकाश पाटील, भास्कर पाटील, खुशाल पाटील, जगदीश पाटील, अनिल पाटील, प्रवीण पाटील, दीपक पाटील आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Theft of water on a sack at Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.