बोदवड शहरात एकाच रात्री पाच ठिकाणी चोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 08:55 PM2020-12-20T20:55:45+5:302020-12-20T20:55:59+5:30
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Next
ब दवड : शहरात एकाच रात्री पाच ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. १९ रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील हिदायत नगर तसेच मलकापूर रोड वरील बियरबार, तर मण्यारडा या परिसरात चोरट्यानी हैदोस घालत माल लंपास केला. या घटनांबाबत वृत्त असे की, शहरातील हिदायत नगर मध्ये राहणारे कुत्बोद्दीन मेकॅनिकल यांचे बंद घर चोरट्यानी फोडले व कपाटातील साहित्याची नासधूस करत ऐवज चोरला मात्र ते घरी नसल्याने किती रुपयांचा ऐवज चोरीस गेला, याबाबतची माहिती कळू शकली नाही. तर याचठिकाणी बाजूलाच असलेले मसुम बाबा यांचे घरही टिकम ने फोडण्याचा प्रयत्न झाला असून त्यांनी आरडाओरड केल्याने या ठिकाणी चोरांना चोरी न करताच पळ काढावा लागला. याच परिसरातील जविदखान शेरखान यांचे घरही फोडले व त्यातून लहान मुलाच्या गळ्यातील दोन ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट तसेच पायातील पैंजण असा जवळ पास पंधरा हजारावर किमतीचा ऐवज घरातून चोरट्यानी नेला. याबाबत शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपप्रमुख कलीम शेख यांच्या सोबत रहिवासी रात्री उशिरापर्यंत बोदवड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी हजर होते. याचबरोबर मण्यार वाड्यात घरा समोर लावलेली असिफ शे महेबूब मण्यार यांची दुचाकीही लांबवली आहे.