..तर विषप्राशन करीत आत्महत्या करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:23 PM2017-09-04T22:23:09+5:302017-09-04T22:27:25+5:30

काळखेडे ग्रामस्थांनी मालदाभाडी स्टार्च प्रकल्पाच्या दूषित पाण्याच्या पाईप लाईनचे पाडले काम बंद

... then do suicide by poisoning | ..तर विषप्राशन करीत आत्महत्या करू

..तर विषप्राशन करीत आत्महत्या करू

googlenewsNext
ठळक मुद्देशेतक:यांनी विषारी द्रव्य असलेल्या बाटल्या सुद्धा आपल्या सोबत आणल्या होत्या.मंडळ अधिकारी एस.एस. पवार व तलाठी किशोर काळे यांना शेतक:यांचे व ग्रामस्थ यांचे जाब जवाब घेऊन पंचनामा केला. त्यानंतर पाईपलाईनचे काम बंद केले.स्टार्च फॅक्टरीतील दूषित पाणी हे त्या परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या दूषीत पाण्यामुळे अनेक वेळा नवी दाभाडी गावांचे ग्रामस्थांनी आंदोलन सुद्धा केले आहे.

ऑनलाईन लोकमत 
जामनेर,दि.4 - तालुक्यातील मालदाभाडी जवळील स्टार्च प्रकल्प  (हॉनेष्ट कंपनी) चे दूषित पाणी काळखेडे शिवारात नेऊन सोडणा:या पाईप लाईनचे काम सोमवारी सकाळी नऊ वाजता ग्रामस्थांनी आंदोलन करून बंद पाडले. 
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून फॅक्टरीपासून 7 ते 8 किलोमिटर अंतरावरील काळखेडे व नागणचौक। शिवारातील काही जमीन अधिग्रहित केले आहे. या ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. त्या जमिनीत हे पाणी सोडले जाणार होते. सोमवारी सकाळी नऊ वाजेचे सुमारास जे.सी.बी.द्वारे पाईपलाईन टाकण्याचे काम व चारी खोदली जात असताना  काळखेडे ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेतली. काम थांबविण्यासाठी नागरिकांनी जे.सी.बी. वर चढून आंदोलन केले. काम बंद न केल्यास विषप्राशन करून आत्महत्त्या करण्याचा इशारा सुद्धा यावेळी ग्रामस्थांनी दिला. एक तासानंतर फॅक्टरीचे दोन कर्मचारी व मंडळ अधिकारी, तलाठी आल्यावर पंचनामा करून काम बंद करण्यात आले.


मालदाभाडी स्टार्च फॅक्टरीचे दूषीत पाणी काळखेडे शिवारात येत असल्याने त्या दूषित पाण्याला सर्व गावक:यांचा विरोध आहे. या दूषित पाण्यापासून जमिन नापिक होते. तसेच ते पाणी आरोग्यास हानिकारक आहे. योग्य ती कारवाई करावी, असे निवेदन सरपंच व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना दिले आहे.
 

Web Title: ... then do suicide by poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.