...तर सुनील झंवर, कंडारेची मालमत्ता जप्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:18 AM2021-03-01T04:18:22+5:302021-03-01T04:18:22+5:30

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाने पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ११ फेब्रुवारी रोजी शहरात येऊन दोघांच्या घरासह,न्यायालयाचे मुख्य प्रवेशद्वार शहर ...

... then Sunil Zanwar, Kandare's property will be confiscated | ...तर सुनील झंवर, कंडारेची मालमत्ता जप्त होणार

...तर सुनील झंवर, कंडारेची मालमत्ता जप्त होणार

Next

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाने पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ११ फेब्रुवारी रोजी शहरात येऊन दोघांच्या घरासह,न्यायालयाचे मुख्य प्रवेशद्वार शहर पोलीस स्टेशन व काव्यरत्नावली चौक आदी ठिकाणी नोटीसा डकविल्या होत्या. या दोघांच्या शोधार्थ पुणे आर्थिक गुन्हे शाखा, डेक्कन पोलीस ठाण्याचे पथके राज्यात तसेच परराज्यात रवाना झाली आहेत.

पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यासह ग्रामीणमधील दोन अशा तीन ठिकाण ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याबाबत बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, विवेक ठाकरे, सीए.महावीर जैन, धरम सांखला, सुजीत वाणी यांच्यासह इतरांविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. सुनील झंवरचा मुलगा सूरज यालाही अटक झालेली आहे. कंडारे व झंवर मात्र दोघही गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना सापडू शकलेले नाहीत. दोघांविरुध्द वारंटही काढण्यात आले होते, तरी देखील ते हजर झाले नाहीत. त्यामुळे या दोघांना फरार घोषीत करण्याची कारवाई पोलिसांकडून सुरु करण्यात आली. पुणे विशेष न्यायालयाचे न्या. एस.एस.गोसावी यांनी १० मार्चपर्यंत न्यायालयात हजर व्हा, अन्यथा फरार घोषीत केले जाईल, असा इशारा वजा आदेशच दिला आहे.

काय आहे मालमत्ता जप्तीची प्रक्रिया

माजी सरकारी वकील तथा ज्येष्ठ विधीज्ञ गोपाळ जळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीसी ८२ अन्वये न्यायालय शरण येण्यासाठी ३० दिवसाची मुदत देऊ शकते. या दोघांना तशी मुदत न्यायालयाने दिलेली आहे. त्यानंतर सीआरपीसी ८३ अन्वये फरार झालेल्या दोघांच्या नावावर असलेली जमीन, शेती, घर व इतर मिळकती जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत जप्त करण्याचे न्यायालय आदेश देऊ शकते. त्यांच्या या मिळकतींवर बोझाही बसविला जाऊ शकतो. या मालमत्ता विक्रीही करता येत नाही.

Web Title: ... then Sunil Zanwar, Kandare's property will be confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.