प्रचंड खर्च करून देखील बळीराजाची झोळी खालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 01:13 AM2018-10-01T01:13:21+5:302018-10-01T01:17:22+5:30

आडगाव ता. चाळीसगाव परिसरात यंदा पावसाने दगा दिल्याने खरीप हंगामासाठी शेतीत भरपूर पैसा लावून पिकांची लागवड केली, परंतु त्यातून नगण्य उत्पन्न येणार असल्याने बळीराजाची झोळी यंदा खालीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 There is also a lot of sacrifices under the huge expenditure | प्रचंड खर्च करून देखील बळीराजाची झोळी खालीच

प्रचंड खर्च करून देखील बळीराजाची झोळी खालीच

Next
ठळक मुद्देकमी पावसामुळे आणि ऊसावर आलेल्या रोगामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे मन्याड धरणात पाणीच नसल्यामुळे यंदा उन्हाळी पिके घेताच येणार नसल्याची स्थिती येऊ घातली आहे.

सायगांव, ता. चाळीसगाव : गिरणा परिसरांतील शेतकऱ्यांची परिस्थिती यंदा एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे. खरीप हंगामासाठी शेतीत भरपूर पैसा खर्च करुन देखील हाती पिक येत नसल्याने जिकडे तिकडे नाराजीचाच सूर उमटतांना दिसत आहे.
कपाशीची आवक कमी आणि यंदा भाव मात्र जास्त
गिरणा परिसरांत शेतकºयांनी यंदा कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती, पण पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने कपाशीचे उत्पन्न जेमतेमच म्हणजे २० टक्क्यापेक्षा कमीच येईल की काय असा प्रश्न सध्या शेतकºयांपुढे आ वासून उभा आहे. त्यातच हंगामाच्या सुरुवातीला कपाशीला सहा हजारापर्यंत सध्या भाव मिळत आहे पुढे हा भाव कमी केला जातो आणि शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसले जातात. त्या वेळेस मिळणाºया भावामुळे कपाशी लागवडीचा खर्च देखील निघत नाही. कपाशीची आवक कमी आणि भाव जास्त अशी स्थिती यंदादेखील निर्माण झाली आहे.
सध्या या परिसरात कपाशीची थोडया फार प्रमाणात वेचणीला सुरुवात झाली असून शासनाकडून हमीभाव घोषीत करावा अशी मागणी होत आहे .
ऊसावर हुमनीचे आक्रमण
यंदा गिरणा परिसरांत उसाची लागवड मोठया प्रमाणात करण्यात आली आहे. शेतकºयानी खर्च देखील मोठया प्रमाणात केला होता पण उसावर हुमनी रोगाचे आक्रमण आणि अत्यंत कमी पाऊस त्यामुळे उसाचे पिक देखील येणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने ज्या शेतकºयांच्या ऊसांवर हुमनी रोग आढळून येत आहेत त्या शेताचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. तसेच बºयाच शेतकºयांचे कमी पावसामुळे आणि ऊसावर आलेल्या रोगामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
बोंडअळीच्या पैशांची प्रतीक्षाच सायगांव व परिसरांत मागच्या वर्षी पंचनामे झालेल्या बोंडअळीग्रस्त कपाशीचे पैसे गिरणा परिसरातील शेतकºयांच्या खात्यावर पडले पण सायगांव येथील शेतकº्यांना बोंडअळीचे पैसेच मिळाले नसल्याने नाराजीचा सूर कायम असून शेतकरी याबाबत एकमेकाना विचारताना दिसत आहेत.
अजूनही पावसाची आशा
या वर्षी पाऊस न झाल्याने मन्याड धरणात पाणीच नसल्यामुळे यंदा उन्हाळी पिके घेताच येणार नसल्याची स्थिती येऊ घातली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या संकटात भर पडली आहे. आता पावसाळा संपल्यात जमा असला तरी नवरात्रोत्सवाच्या काळात त्याची काही अंशी तरी हजेरी लागेला अशी आशा अजूनही असून त्यातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी का होईना सुटण्यास मदत होईल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

यंदा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर
या वर्षी गिरणा व मन्याड परिसरात पाऊसच झाला नसल्याने शेतकºयांची कमाई तर गेलीच पण मन्याड धरणात परिसरातील खेड्यांना यंदा पिण्याच्या पाण्याचे सर्वात मोठे संकट उभे राहणार आहे. त्यातच गुरे ढोरे यांचा देखील चाºयाचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून परिसरातील विहिरींची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. काही विहिरी २ ते ३ तासच चालत असल्याने येणारा उन्हाळा हा फार मोठे संकट उभे करणार असल्याचे संकेत आतापासूनच जाणवू लागले आहे . त्यामुळे शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Web Title:  There is also a lot of sacrifices under the huge expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी