भुसावळ पालिकेत कचरा टाकून व्यक्त केला संताप

By admin | Published: May 19, 2017 11:56 AM2017-05-19T11:56:34+5:302017-05-19T11:56:34+5:30

स्वच्छता केल्यानंतर साधा कचरा उचलण्यासाठीदेखील नगरपालिका प्रशासन दखल घेत नसल्याने

There is anger in Bhusawal corporation by throwing garbage | भुसावळ पालिकेत कचरा टाकून व्यक्त केला संताप

भुसावळ पालिकेत कचरा टाकून व्यक्त केला संताप

Next

ऑनलाइन लोकमत

भुसावळ, जि. जळगाव, दि. 19 -   देशभरात अस्वच्छतेच्याबाबतीत दुसरा क्रमांक आल्यानंतर सामाजिक संस्थांनी हाती झाडू घेत शहराचे चित्र पालटण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र स्वच्छता केल्यानंतर साधा कचरा उचलण्यासाठीदेखील नगरपालिका प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिकांनी हा कचराच पालिकेच्या आरोग्य अधिका:यांच्या दालनासमोर आणून तीव्र संताप व्यक्त केला़ पालिका व सत्ताधा:यांची या प्रकारा नंतर तरी झोप उघडणार काय? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला.
शहरातील डी़एस़ग्राऊंडवर गेल्या दोन दिवसांपासून सामाजिक संस्थांतर्फे स्वच्छता अभियान राबवले जात आह़े शुक्रवारीदेखील सकाळी त्याठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आल़े या अभियानात  गोळा केलेला कचरा उचलून नेण्यासंदर्भात पदाधिका:यांनी पालिका प्रशासनाला कळवले मात्र दोन तासानंतरही पालिकेने दखल न घेतल्याने संतप्त पदाधिका:यांनी हा कचराच पालिकेच्या आवारातील आरोग्य अधिका:यांच्या दालनापुढे आणून संताप व्यक्त केला़
प्रसंगी राजेश्री संघमित्रा फाउंडेशनच्या राजेश्री सुरवाडे, ऑल प्युजर फाउंडेशनचे शुभम पवार, दर्शन चिंचोले, तेजस रणधीर, हर्षल चव्हाण, सुरज अवस्थी, नीतेश तेलंग यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती़

Web Title: There is anger in Bhusawal corporation by throwing garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.