शहरात 2200 अनधिकृत नळजोडणी

By admin | Published: April 18, 2017 12:24 AM2017-04-18T00:24:12+5:302017-04-18T00:24:12+5:30

अमळनेर : नगरपालिकेने शोधमोहीम राबवावी, अनधिकृत नळधारकांना दंड आकारून ते नियमित करण्याची गरज

There are 2200 unauthorized connections in the city | शहरात 2200 अनधिकृत नळजोडणी

शहरात 2200 अनधिकृत नळजोडणी

Next

अमळनेर : शहरात नळधारकांची संख्या प्रचंड असली तरी यातील 2200  नळजोडणी अनधिकृत आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे अनधिकृत नळजोडणीधारक शहरातील करदात्यांच्या हिश्याचे पाणी फुकटात पळवत आहेत. ही बाब नगरपरिषद प्रशासनाला माहीत असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्यापर्पयत करण्यात आलेली नाही.
पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात 21 हजार मालमत्ताधारक आहेत. मात्र नगरपरिषदेची नळजोडणी फक्त 12 हजार 500 मालमत्ताधारकांनी घेतली आहे. उर्वरित मालमत्ताधारक एकतर वैयक्तिक बोअरवेलवरून पाणी घेत असावेत अन्यथा त्यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेतले असावे, असा तर्क  आहे. 
 नगरपरिषदेतर्फे  शहरात करण्यात आलेल्या सव्रेक्षणानुसार केवळ 2200 कनेक्शन अनधिकृत असल्याचे पाणीपुरवठा अभियंता श्यामकुमार करंजे सांगतात. त्यामुळे दरवर्षी 1800 रुपयांप्रमाणे पाणीपट्टी भरणा:या नागरिकांच्या हिश्याचे पाणी पळवणा:या या अनधिकृत नळधारकांची जोडणी  बंद  झाली पाहिजे. अन्यथा त्यांच्याकडून दंड वसूल करून त्यांना नगरपरिषदेने नियमित करून घेतले पाहिजे.
ज्यामुळे नियमित कर अदा करणा:या करदात्यांवर अन्याय होणार नाही.
नुकतेच नगरपरिषद प्रशासनाने सर्वसामान्य करदात्यांनी भरलेल्या कराच्या रकमेतून 14 लक्ष रुपये भरून हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन घेतले आहे. त्यामुळे शहरवासीयांना मिळणारे पाणी अमूल्य आहे. त्यामुळे  नगरपरिषद प्रशासनाने फुकट पाणी घेणा:यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
अनधिकृत नळजोडणी देण्यात पालिकेतील काहींचा सहभाग असू शकतो. पालिकेचे आर्थिक नुकसान करणा:यांचाही  शोध घेणे गरजेचे आहे.
 जळोद येथून दररोज एक कोटी लीटर पाणी शहरात पुरवले जाते.  त्यापैकी हजारो लीटर पाण्याची गळती रोज होते. ही गळती सार्वजनिक नळ कनेक्शन आणि, सदोष पाईपलाईनमुळे होत. करदात्यांच्या रकमेतून आणलेले पाणी अशा पद्धतीने वाया जात असताना नगरपरिषद दररोज दर मानसी 100 लीटर पाणी पुरवत असल्याचे दावा  पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात येतो. 
आजही शहरात अनेक भागात नगरपरिषदेचे पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी पाण्याचे योग्य नियोजन केल्यास, पाण्याची गळती आणि अनधिकृत नळजोडणी बंद केल्यास शहराला ऐन उन्हाळ्यात ते एक दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकते. यासाठी पालिकेने शोधमोहीम राबविण्याची गरज आहे.
जीर्ण पाईपलाईन शोधावी
शहरात ज्या भागात जीर्ण पाईपलाईन झाली आहे, तीदेखील बदलण्याची आवश्यकता आहे. कारण या जीर्ण पाईपलाईनमुळेही पाण्याची नासाडी मोठय़ा प्रमाणावर होत असते.               (वार्ताहर)

Web Title: There are 2200 unauthorized connections in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.