संसाराची चाके जोडताना येथे रोज उडतात खटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:30 PM2019-11-18T12:30:15+5:302019-11-18T12:30:34+5:30

महिला सहाय्य कक्षातील स्थिती : सुशिक्षितांमध्ये भांडणाचे प्रमाण अधिक, अशिक्षित कुटुंबे घेतात दोन पावले माघार

 There are knocks here every day while connecting the wheels of the world | संसाराची चाके जोडताना येथे रोज उडतात खटके

संसाराची चाके जोडताना येथे रोज उडतात खटके

Next

सुनील पाटील ।
जळगाव : आजच्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी व आपला दिवस आनंदात जावा असे प्रत्येकाला वाटते. पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षात मात्र दिवसाची सुरुवात आणि शेवटही वाद व कटकटीनेच होतो. त्यामुळे येथे काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना डोक्यावर बर्फ ठेवून काम करावे लागत आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत महिला सहाय्य कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून कौटुंबिक वाद विवाद मिटविण्याचे मुख्य काम केले जाते. पोलिसात गुन्हा दाखल होण्याच्या आधी पती-पत्नींना या प्रक्रियेतून जावे लागते. येथे नाहीच समाधान झाले तर गुन्हा दाखल किंवा न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग मोकळा होतो.
सहायक पोलीस निरीक्षक नीता कायटे या कक्षाच्या प्रमुख आहेत. त्यांच्या दिमतीला सहायक फौजदार अन्नपूर्णा बनसोडे, सुमन तायडे, शैला बाविस्कर, सविता परदेशी, वैशाली पाटील व मनिषा पाटील यांची टीम देण्यात आली आहे.


पत्नी-पत्नीत फ्री स्टाईल...
या कक्षातील अन्नपूर्णा बनसोडे यांनी सांगितले की, पती-पत्नीतील वाद मिटविण्यासाठी दोघांना तारीख दिलेली असते. तारखेवर आल्यानंतर काही दाम्पत्यांमध्ये एकमेकांना पाहिल्यावर लगेच द्वेषाची भावना निर्माण होते. प्रकरणाची सुरुवात होण्याआधीच बाहेर कधी कधी पती-पत्नीत तर कधी सासू-सून, नणंद, दीर, जेठ यांच्यात शाब्दीक वाद होऊन हाणामारीच्या घटना घडतात.
शाब्दीक वाद तर रोजचेच, मात्र हाणामारीची घटना आठवड्यातून किमान दोन वेळा तरी घडतातच. काही प्रकरणांमध्ये कक्षाच्या बाहेर जाताच दाम्पत्यात खटके उडून फ्रि-स्टाईल होते. अशा वेळी तत्काळ पुरुष पोलिसांची मदत घेतली जाते, काही प्रकरणात पोलिसात तक्रार केली जाते.

डॉक्टर दाम्पत्यात जुंपली.....
शुक्रवारी डॉक्टर दाम्पत्याचे एक प्रकरण या कक्षाकडे आले होते. दोघंही उच्च शिक्षित असताना त्यांच्यात जोरदार खडांजगी झाली. पती-पत्नीत सन्मान बाजूला ठेवून ‘आरे ला कारे’ चे उत्तर दोघांकडून दिले जात होते. दोघांमधील वादाचे कारण ‘इगो’ होता. तू मला चांगली वागणूक देतच नाही, तर पत्नीनेही...तू मला नोकर समजतो..तुला संसारच करायचा नाही असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करुन दोघंही एकमेकाच्या अंगावर धावून गेले. पती-पत्नी उच्च शिक्षित असतानाही दोघांमधील तणाव पाहता या सहायक निरीक्षक नीता कायटे व महिला पोलीस सहकाºयांनी बाहेर धाव घेत दोघांची समजूत घातली. कायद्याचे डोस पाजले. समाजातील आपले स्थान यावर प्रकाशझोत टाकल्यानंतर डॉक्टर दाम्पत्य नरमले आणि त्यांच्या कटूता काही अंशी दूर झाली.

‘खाकी’चाही धाक नाही ठेवत काही कुटुंब
पोलीस अधीक्षक कार्यालय, उपअधीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचेही कार्यालय, त्यांच्याच अख्त्यारीत हा कक्ष. समोर पोलिसांचा लवाजमा असे असतानाही काही प्रकरणात कौटुंबिक वाद इतका टोकाला गेले की या यंत्रणेसमोरच दोन गटात हाणामारीच्या घटना घडतात. उच्च शिक्षित कुटुंबात हे प्रमाण अधिक आहे, तर अशिक्षित कुटुंब मात्र दोन पावले माघार घेताना दिसून आलेत.

रोज दिवसभर कुटुंबातील वाद मिटविताना सायंकाळपर्यंत मानसिकस्थिती खूप बिघडते. कधी कधी या कुटुंबातील वादाचे पडसाद व परिणाम घरीही उमटतात. डोक्यावर बर्फ ठेवूनच येथे काम करावे लागते. प्रत्येक कुटुंब आनंदानेच परत जावे ही आमची अपेक्षा असते.
-नीता कायटे, सहायक पोलीस निरीक्षक
 

Web Title:  There are knocks here every day while connecting the wheels of the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.