निंभोऱ्यात दोन गटात हाणामारी
By admin | Published: April 4, 2017 11:08 PM2017-04-04T23:08:12+5:302017-04-04T23:08:12+5:30
येथील एकाच समाजातील दोन गटात बांधकामाच्या मोजणीतील वादातून झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील दहा ते बारा जण जखमी झाले.
ऑनलाइन लोकमत
निंभोरा बु.।। (ता.रावेर), दि. 04 - येथील एकाच समाजातील दोन गटात बांधकामाच्या मोजणीतील वादातून झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील दहा ते बारा जण जखमी झाले. ही घटना ४ एप्रिल रोजी सकाळी ११ ते ११.३० घडली. दरम्यान, हाणामारी प्रकरणी पोलिसांनी ४६ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पहिल्या गुन्ह्यात फिर्यादी जुबेर खान अजिज खान (रा.मुस्लीमवाडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात ४ रोजी दुपारी आरोपी शेख फरीद शेख आरीफ, शेख आसिफ शेख गुलाब, शेख बालू शेख मुनीर, शेख गुलाब शेख गफूर, शेख इकबाल शेख गफूर, शेख सईद शेख गफूर, शेख रफीक शेख रशीद, शेख फिरोज शेख रफीक, शेख बशीर शेख रशीद, शेख हारुन शेख सलीम, शेख सलीम शेख मुनीर, शेख वजीर शेख गुलाब, यास्मीन बी.शेख बशीर, तैयसीम बी शे.बशीर, शमीम बी.शेख रफीक, मैयमुना बी.शेख रशीद ( रा.निंभोरा बु.।।) यांनी फिर्यादी यांचे वडील यांच्या घरासमोरील सीटीसर्व्हे ८५५ मध्ये ओटा बांधलेला आहे. त्याबाबत न्यायालयात केस चालू असल्याने कोर्टाच्या आदेशाने या ठिकाणी अॅड.युसूफ ,अॅड. गाढे मोजमाप करीत असताना यातील आरोपी शेख फरीद शेख शरीफ, शेख बालू शेख मुनीर, शेख गुलाब शेख गफूर हे वकीलांना म्हणाले की, आम्ही सांगतो त्याप्रमाणे करा असे म्हणून आरोपी यांनी हातात काठ्या व दगड घेऊन फिर्यादी व साक्षीदारांना डोक्यावर, हातावर, पायावर व पाठीवर मारहाण केली.
साक्षीदार यांना किरकोळ व गंभीर दुखापत करून शिवीगाळ दमबाजी केल्याने पोलीस ठाण्यात गुरनं. २१/२०१७ भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ३३७, ५०४, ५०६, ३७ (१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या गुन्ह्यात शेख बालू शेख मुनीर यांनी फिर्याद दिली असून यात ४ रोजी दुपारी ११ वाजेदरम्यान आरोपी शेख गुलाब शेख अकबर, शेख हसन शेख अकबर, शेख जावेद शेख गुलाब, शेख आसिफ शेख गुलाब, जुबेर खान अजीज खान, आयुब खाँ मेहमूद खॉ, युसूफ खान मेहमूद खान, हबीब खाँ मेहमूद खॉं, हमीद खाँ मेहमूद खाँ, अनीस खाँ हमीद खाँ, इमरान खाँ हमीद खाँ, फिरोज खाँ युसूफ खाँ, शेख पप्पू शेख हसन, सलमान खॉ अयुब खाँ, शाहरूख खाँ आयुब खाँ, शेख सांडू शेख गफूर, शेख युसूफ शेख शकृूर, आरस्तूल बी अजीज खाँ, अजीज खाँ हैदर खाँ, यासीन बी उर्फ गुड्डी बी अजीज खाँ, भुरी अजीज खाँ, अलीशान बी मर्द महेमूद खाँ, तसलीन बी.हमीद खाँ, शमीम बी.शेख हसन, खैराबी हबीब खाँ, शेख वसीम शेख बिस्मील्ला, शेख शाबीर शेख बिस्मील्ला, मोनाबी शेख जावीद, सायराबीे अय्यूब खाँ (सर्व रा.निंभोरा बु.।।) यांनी सिटी सर्वे ८५५ मध्ये मोजमाप करण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी काठ्या, दगड विटानी मारहाण केली. शिवीगाळ दमबाजी केली यावरून निंभोरा पोलीस ठाण्यात भाग पाच गुरनं. २२/२०१७ भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२६, ३२४, ३२३, ३३७, ५०४, ५०६, ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे असा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच फैजपरचे पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक थोरात व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कदम, फौजदार ज्ञानेश्वर पाकळे व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोख बंदोबस्त लावण्यात आला. तपास फैजपूर उपविभागीय अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम, फौजदार पाकळे व पोलीस तपास करीत आहे. जखमींवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(वार्ताहर)
काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात
- दोन्ही गटातील मारहाण प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींना पोलीस ठाण्यात बसवून ठवेले आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर अटकेची कारवाई केली नसल्याचे सांगितले. गावात शांतता आहे. गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.