लोकप्रतिनिधींच्या घर परिसरात मतदानात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:36 PM2019-05-04T12:36:08+5:302019-05-04T12:36:52+5:30

३३ केंद्रांवर ४० टक्केच्या आत मतदान

There is a decline in voting in the House of Representatives | लोकप्रतिनिधींच्या घर परिसरात मतदानात घट

लोकप्रतिनिधींच्या घर परिसरात मतदानात घट

Next

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी शिक्षित परिसरात मतदानाची टक्केवारी झोपडपट्टी भागापेक्षा कमी असल्याचे आकडेवारीवरून समोर आले असून शहरातील ३३ मतदान केंद्रांवर ४० टक्केच्या आत मतदान झाले असून यात आमदार सुरेश भोळे यांच्या निवासस्थान परिसरातील चार मतदान केंद्रांचा समावेश आहे. सर्वाधिक ७०.९८ टक्के मतदान कंवरनगर मेहरुणमधील २७६ क्रमांकाच्या मतदान केंद्रात झाले आहे तर सर्वात कमी १९.९० टक्के मतदान सुयोग कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळील मतदान केंद्र क्रमांक २९९वर झाले आहे.
मतदानाची आकडेवारी पाहता शिक्षित भागातील मतदानाचा टक्का हा झोपडपट्टी भागापेक्षा कमी असल्याचे दिसून येते.
कमी टक्केवारी असलेले मतदान केंद्र
सुयोग कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळील मतदान केंद्र क्रमांक २९९वर १९.९० टक्के, रिंग रोडवरील स्टेट बँकेजवळील मतदान केंद्र क्रमांक २०२ वर - २६ टक्के, पोलीस मुख्यालयाजवळील मतदान केंद्र क्रमांक २२९ - २६.२० टक्के, सिंधी कॉलनीजवळील मतदान केंद्र क्रमांक २५३ - २९.११ टक्के, पोलीस मुख्यालयाजवळील मतदान केंद्र क्रमांक २२८ - २९.२१ टक्के, ख्वाजा मिया चौकाजवळील मॉडर्न गर्ल्स स्कूल मतदान केंद्र क्रमांक २०० - २९.७० टक्के, आर.आर. विद्यालय मतदान केंद्र क्रमांक २०४ - ३०.७२ टक्के, मू.जे. महाविद्यालय मतदान केंद्र क्रमांक २३३ - ३१.०४ टक्के, महाबळ रोड मेहरुण मतदान केंद्र क्रमांक ३५२ - ३३.८१ टक्के, आर.आर. विद्यालय मतदान केंद्र क्रमांक २०५ - ३४.१२ टक्के, मतदान केंद्र क्रमांक २०७ - ३४.३८ टक्के, शिवराम नगर मतदान केंद्र क्रमांक २८९ - ३५.१७ टक्के, आयोध्यानगर मेहरुण मतदान केंद्र क्रमांक २१८ - ३५.३६ टक्के, ख्वाजामिया चौक मतदान केंद्र क्रमांक १८९ - ३५.४५ टक्के, शिवकॉलनी मतदान केंद्र क्रमांक १८३ - ३७.२७ टक्के, गेंदालाल मिल मतदान केंद्र क्रमांक २३ - ३७.३६ टक्के,शिवराम नगर मतदान केंद्र क्रमांक २८६ ए - ३७.५७ टक्के, निमखेडी परिसर मतदान केंद्र क्रमांक १२ - ३७.६८, शिवराम नगर मतदान केंद्र क्रमांक २८७ - ३८.१२, मतदान केंद्र क्रमांक २८८-३८.३९टक्के, ख्वाजामिया चौक मतदान केंद्र क्रमांक १९० - ३८.२६ टक्के, शिवकॉलनी मतदान केंद्र क्रमांक १७९ - ३८.५६ टक्के, भिलपुरा चौक मतदान केंद्र क्रमांक ११२ - ३८.५७ टक्के, महाबळ रोड मेहरुण मतदान केंद्र क्रमांक ३५९ - ३९.१० टक्के, पिंप्राळा मतदान केंद्र क्रमांक १४७ - ३९.२२, मतदान केंद्र क्रमांक ३४५- ३९.२६ टक्के, आयोध्यानगर मेहरुण मतदान केंद्र क्रमांक २१६ - ३९.३६ टक्के, शिवकॉलनी मतदान केंद्र क्रमांक १७६ - ३९.३६ टक्के, शिवराम नगर मतदान केंद्र क्रमांक २९२ - ३९.३७, गेंदालाल मिल मतदान केंद्र क्रमांक ३१ ३९.४४ टक्के, आदर्शनगर मेहरुण मतदान केंद्र क्रमांक ३३२ - ३९.४८ टक्के, गणपतीनगर मतदान केंद्र क्रमांक २८४ - ३९.४९ टक्के, मू.जे. महाविद्यालयजवळ मतदान केंद्र क्रमांक २३४ - ३९.६५ टक्के.
५५ टक्केपेक्षा जास्त टक्केवारी असलेले मतदान केंद्र
कंवरनगर मेहरुण मतदान केंद्र क्रमांक २७६ - ७०.९८ टक्के, भिलपुरा पोलीस चौकी मतदान केंद्र क्रमांक १२४ - ६९.०५ टक्के, सुयोग कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळील मतदान केंद्र क्रमांक २९९ ए - ६८.३४ टक्के, चौबे शाळा मतदान केंद्र क्रमांक ६५ - ६४.५६ टक्के, सिंधी कॉलनी मतदान केंद्र क्रमांक २७९ - ६३.६४ टक्के, चौबे शाळा मतदान केंद्र क्रमांक ६३ - ६३.४३ टक्के, भिलपुरा मतदान केंद्र क्रमांक - १११ - ६३.१९ टक्के, ढाकेवाडी केंद्र क्रमांक १९७ - ६३.०८ टक्के, गणेशपुरी मेहरुण मतदान केंद्र क्रमांक २७१ - ६३.०९ टक्के.

Web Title: There is a decline in voting in the House of Representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव