सारीचा एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:19 AM2021-06-09T04:19:20+5:302021-06-09T04:19:20+5:30
रस्त्यावर धुळीचा त्रास जळगाव : शहरातील अनेक रस्त्यांवर आता धूळ वाढली असून या धुळीचा वाहनधारकांना त्रास होत आहे. कोरोनापासून ...
रस्त्यावर धुळीचा त्रास
जळगाव : शहरातील अनेक रस्त्यांवर आता धूळ वाढली असून या धुळीचा वाहनधारकांना त्रास होत आहे. कोरोनापासून बचावासाठी वापरण्यात येणारे मास्क यात महत्त्वाचे असून ते या धुळीपासूनही संरक्षण करणारे आहे. त्यामुळे शक्यतोवर वाहनावरही हे मास्क काढू नये, असा सल्ला डॉक्टर देतात. मात्र, डोळ्यांना या धुळीच प्रचंड त्रास होत आहे.
जळगाव ग्रामीणमध्ये दिलासा
जळगाव : जळगाव ग्रामीणमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ही ११० वर पोहोचली असून अनेक गावे कोरोनामुक्त झाली आहे. त्यामुळे या भागात दिलासा आहे. कोरोनाचे नवीन आढळून येणारे रुग्णही घटले असून त्यापेक्षा अधिक रुग्ण बरे होत असल्याने दिलासादायक वातावरण आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे.
९८ अहवाल प्रलंबित
जळगाव : कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण हवे तेवढे वाढलेले नाही. दिवसाला किमान साडेचार ते पाच हजार चाचण्या अपेक्षित असताना सोमवारी मात्र, कमी चाचण्या झाल्या असून आता ९८ चाचण्यांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती प्रशासकीय अहवालात देण्यात आली आहे. त्या तुलनेत सद्या अँटिजेन चाचण्यांचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र आहे.
जि.प.त वर्दळ
जळगाव : जिल्हा परिषदेत सोमवारी शंभर टक्के उपस्थितीचे नवीन निकष लागू झाल्यानंतर गर्दी झाली होती. शिवाय अनेक सदस्य व अभ्यागतांनीही भेट दिली होती.
चालकांची नोंदणी
जळगाव : महानगर भाजपा ऑटो रिक्षा, स्कूल व्हॅन आघाडी व नेताजी सुभाष चंद्र बोस रिक्षा युनियनकडून रिक्षा चालकांसाठी ऑनलाईन अर्ज भरणा केंद्र सुरू करण्यात आले असून या ठिकाणी १०३७ रिक्षा चालकांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. रिक्षा चालकांना १५०० रुपये अनुदान मिळणार आहे.
रोगनिदान शिबिर
जळगाव : भारत विकास परिषद आणि संपर्क फाउंडेशनतर्फे म्यूकरमायकोसिस रोगनिदान शिबिर १८ जूनपर्यंत आहे. डॉ. अनिता भोळे, डॉ. ललित पाटील, डॉ. माधुरी पाटील, डॉ. गोंविंद मंत्री हे डॉक्टर तपासणी करणार आहे.